Tarun Bharat

लोकमान्य सोसायटीतर्फे नेत्र तपासणी

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने गुरुवारी सोसायटीचे कर्मचारी संचालक व व्यवस्थापक सदस्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नंदादीप नेत्रालयाच्या सहयोगाने भाग्यनगर येथील लोकमान्यच्या रिजनल ऑफिसमध्ये हे शिबिर पार पडले. यावेळी 235 हून अधिक कर्मचारीवर्गाची नेत्र तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमात बोलताना लोकमान्यचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी म्हणाले, ‘नंदादीप नेत्रालयाच्या सहकार्याने लोकमान्य परिवारातील सदस्यांच्या नेत्र तपासणीसाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. यानंतर प्रत्येक शाखेमध्ये ग्राहकांसाठी नेत्र तपासणी घेण्याचा मानस आहे.’ लोकमान्यचे संचालक, व्यवस्थापक मंडळातील सदस्य, हेड ऑफिस, रिजनल ऑफिस यासह विविध शाखांमधील कर्मचाऱयांनी या शिबिरामध्ये भाग घेतला. नंदादीप नेत्रालयाच्या तज्ञ डॉक्टरांनी सर्वांची नेत्र तपासणी केली.

यावेळी लोकमान्यचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, नंदादीप नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर आनंद तुप्पद, ऍडमिन मॅनेजर इरय्या मास्तमर्डी, शिवराज रासल, रोमन गांगुली, देबेश मित्रा, शहारूख नाईक, सागर गोब्बुर यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

राज्य सरकारने निर्णायक क्षणी हात वर केले: माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची टीका

Archana Banage

खटल्याच्या निकालाआधीच लावला निकाल

Amit Kulkarni

एड्सबाधित-सामान्य व्यक्तींमधील दरी दूर झाली पाहिजे

Patil_p

मण्णूर येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मासचे आचरण

Amit Kulkarni

केवळ शांतता राखण्यासाठी सूचना!

Omkar B

योग्य खबरदारी हाच कोरोना व्हायरसचा उपाय

Patil_p
error: Content is protected !!