Tarun Bharat

लोकमान्य सोसायटीतर्फे सामाजिक संघटनांना धान्याचे वितरण

Advertisements

प्रतिनिधी / बेळगाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत अन्नवाटप करणाऱया संघटनांना धान्याचे वितरण करण्यात आले. सोसायटीने सामाजिक बांधिलकी जपत 200 किलो तांदूळ संघटनांना दिले आहेत.

म. ए. समितीच्यावतीने मराठा मंदिर येथे लोकसहभागातून कोरोना आयसोलेशन सेंटर सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्वसामान्यांवर उपचार केले जात असून त्यांना मोफत जेवण पुरविले जात आहे. त्यामुळे लोकमान्य सोसायटीने 100 किलो तांदूळ म. ए. समितीकडे दिले आहेत.

श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते कोरोना काळात उत्तम सेवा देत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार व रुग्णांना रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध करून दिली जात आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्न दिले जात असल्याने लोकमान्य सोसायटीने 100 किलो तांदूळ संघटनेला दिले आहेत.

यावेळी लोकमान्य सोसायटीचे रिजनल मॅनेजर मधुकर कुलकर्णी, असिस्टंट रिजनल मॅनेजर चंद्रशेखर पाटील, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, लिगल मॅनेजर विश्वनाथ जोशी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे प्रमुख रमाकांत कोंडूसकर, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, मदन बामणे, सागर पाटील, अंकुश केसरकर, बाळू जोशी, श्रीकांत कदम यांच्यासह इतर उपस्थित होते.

Related Stories

गौंडवाड घटनेप्रकरणी दोन एफआयआर

Amit Kulkarni

जलसंवर्धन ही काळाची गरज

Amit Kulkarni

हस्तांदोलन टाळा, गर्दीवर मर्यादा घाला

Amit Kulkarni

समस्त बेळगावकर मराठी मतदारांना कळकळीचे आवाहन!

Amit Kulkarni

जीएसएसतर्फे फौंड्री इंडस्ट्रीज कोर्सचे उद्घाटन

Amit Kulkarni

‘त्या’ रणरागिणींसाठी सरस्वती पाटील यांची जिल्हाधिकाऱयांकडे धाव

Amit Kulkarni
error: Content is protected !!