Tarun Bharat

‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ लोकसेवेसाठी रुजू

जगातील चारही प्रगत रोबोप्रणाली आता पुण्यात

प्रतिनिधी/ पुणे

 जगातील चारही अतिप्रगत रोबो प्रणालींची सुविधा उपलब्ध असलेल्या ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’चे उद्घाटन ज्ये÷ नेते व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. जागतिकस्तरावर शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱया रोजा, कोरी, नॅव्हिओ व ब्रेनलॅप या चारही अत्याधुनिक रोबो प्रणाली उपलब्ध असलेले ‘लोकमान्य’ हे भारतातील एकमेव हायटेक रुग्णालय असल्याने पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

  पुण्यातील सेनापती बापट रोडवरील गोखलेनगर येथे ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ अर्थात ‘लोकमान्य एचएसएस’ हे हायटेक रुग्णालय नव्याने सुरू करण्यात आले आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेंद्र वैद्य व डॉ. मिताली वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी या चारही रोबो प्रणालींचे प्रात्यक्षिक शरद पवार यांच्यासमोर सादर करण्यात आले. 

 जागतिक दर्जाचे स्पेशल सर्जरी रुग्णालय सुरू करण्यासाठी ‘लोकमान्य रुग्णालया’ने घेतलेल्या पुढाकाराचे शरद पवार यांनी कौतुक केले. ते म्हणाले, ‘लोकमान्य’च्या रोपटय़ाचे वटवृक्षात रुपांतर झाले, याचा आनंद आहे. गुणवत्ता आणि सामाजिक जाणीव यामुळे ‘लोकमान्य’ने वैद्यकीय क्षेत्रात देशात नावलौकिक मिळविला आहे. कोरोनासारख्या कठीण काळात ‘लोकमान्य’ने गुणवत्तेबरोबरच सामाजिक भान ठेवले. वैद्यकीय क्षेत्रात पुणे महत्त्वाचे केंद्र बनले असून त्यात लोकमान्य रुग्णालयाचे योगदान मोठे आहे.

 डॉ. नरेंद्र वैद्य यांनी ‘लोकमान्य’च्या वाटचालीचा आढावा घेतला. पाच दशकांच्या वैद्यकीय सेवेची परंपरा असलेल्या ‘लोकमान्य’ हॉस्पिटलने अपघातात गंभीर जखमी झालेल्या एक लाख रुग्णांचे प्राण वाचविले आहेत. शिवाय अस्थिरोगाच्या लाखाहून अधिक शस्त्रक्रिया, दीड लाखांहून अधिक अपघातग्रस्तांवर उपचार तसेच गुडघेदुखीने ग्रस्त लक्षावधी रुग्णांना स्वतःच्या पायावर चालण्याची ताकद दिली. रुग्णसेवेचा हाच वारसा पुढे जपत ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ (एलएचएसएस) साकारले आहे. रुग्णालयातील 104 बेड्समुळे आता ‘लोकमान्य’ रुग्णालयाची एकूण क्षमता 450 बेड्सची झाली आहे. जगातील सर्वोत्तम वैद्यकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हे हॉस्पिटल आहे. तंत्रज्ञानाने निपुण निष्णात डॉक्टर हे या रुग्णालयाचे वैशिष्टय़ आहे. यंत्रमानव अर्थात रोबोच्या माध्यमातून सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे आधुनिक वैद्यकिय शास्त्राचे वरदान आहे. पाच वर्षांपूर्वीच पाश्चात्य देशांमधील हे तंत्रज्ञान ‘लोकमान्य’च्या माध्यमातून पुण्यात उपलब्ध झाले आहे. आजमितीला रोबोच्या साहाय्याने पाच हजारांहून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. जगातील सर्वोत्तम असे नॅव्हिओ, रोझा, कोरी आणि ब्रेनलॅप कॉम्प्युटर असिस्टेड नॅव्हिगेशन या तंत्रप्रणाली असलले ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’ हे देशातील एकमेव हॉस्पिटल असल्याचे डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले.

 भारताबाहेर विस्तार, जगभरातून उपचारासाठी रुग्ण

 कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या अस्थिरोगाबद्दलच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया याशिवाय डोळय़ांचे, हृदयाचे, मूत्रपिंडाचे, रक्तवाहिन्यांचे असे वेगवेगळय़ा अवयवांवरील उपचार व स्पेशल सर्जरी येथे केल्या जातात. कोरोनाच्या काळातही आणि त्यानंतर ‘लोकमान्य’ ग्रुप ऑफ हॉस्पिटल्समध्ये जवळपास 500 शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करणारी सर्व काळजी घेऊन डॉक्टरांनी या शस्त्रक्रिया केल्या. वैद्यकिय शास्त्रातील प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता संगणक, रोबो याद्वारे आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा वापर कुशल पद्धतीने सुरू झाला आहे. जगातील असे अत्याधुनिक तंत्रज्ञान गरजू व सामान्य लोकांना ‘लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी’द्वारे पुण्यात उपलब्ध करण्यात येत आहे, असेही डॉ. नरेंद्र वैद्य यांनी सांगितले. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हे हॉस्पिटलचे वैशिष्टय़ आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा विभागांमध्ये या रुग्णालयाचे 22 बाहय़ रुग्णसेवा कक्ष कार्यरत असून ‘लोकमान्य’चा विस्तार भारताबाहेर केनिया, इथिओपिया व ओमान या देशांमध्ये झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविल्याने जगभरातून येथे रुग्ण येत असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Related Stories

घसरलेल्या टक्केवारीचा लाभ कोणाला?

Amit Kulkarni

आरसीयुसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन

Patil_p

तालुक्मयात पहिला श्रावण सोमवार साधेपणाने

Patil_p

आजपासून शिवगर्जना महानाट्याला प्रारंभ

Amit Kulkarni

पी. के. क्वॉर्टर्सच्या इमारती वापराविना धूळखात

Amit Kulkarni

टपाल कर्मचाऱयांचा संप सुरू

Amit Kulkarni
error: Content is protected !!