Tarun Bharat

लोकल रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरू करण्याचा निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यासंदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


यावेळी या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जराड,  बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, आपत्ती व्यवस्थापन संचालक अभय यावलकर यांच्यासह मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल, मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांच्यासह आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशाप्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

Related Stories

भाटवाडीत कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला

Sumit Tambekar

‘ऑन दी स्पॉट’ लसीकरण मोहिमेला अल्प प्रतिसाद

Abhijeet Shinde

सिद्धनाथवाडीत दोन दुचाकी चोरटे जेरबंद

Patil_p

मराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक

Sumit Tambekar

आनंदीबेन पटेल यांनी स्वीकारला मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त पदभार

Rohan_P

बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाच्या टक्केवारीसाठी लडतरी

Patil_p
error: Content is protected !!