Tarun Bharat

लोकसभेसाठी काँग्रेस भाजपला कडवी टक्कर देऊ शकते – प्रशांत किशोर

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत

पाच राज्यांच्या नामुष्कीजनक पराभवानंतर रविवारी काँग्रेस कार्यकारिणी समितीची साडेचार तास बैठक झाली होती. सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष पदाची धुरा सांभाळण्याची तसेच, आवश्यक संघटनात्मक बदल करण्याचीही विनंती करण्यात आली होती. त्यानुसार पाचही प्रदेशाध्यक्षांना पायउतार होण्यास सांगण्यात आले असून या निर्णयाची माहिती प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे दिली. असुन काँग्रेसमध्ये अंतर्गत खांदपालटच्या हालचाली उशीरा का असेना मात्र सुरु आहेत.

अशा प्रकारे राष्ट्रीय काँग्रेसमधील अंतर्गत कलह वाढला असला तरी रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रीय काँग्रेससाठी दिलासादायकबाब स्पष्ट केली आहे. किशोर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला; पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भाजपला जोरदार टक्कर देईल, असा विश्वास रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलाय. काँग्रेसनं एकदिलानं काम केल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तगडं आव्हान देऊ शकतो, असंही प्रशांत किशोर यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हंटलं आहे.

दरम्यान, झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पक्षातील कमकुवतपणा दूर करण्यासाठी आणि पक्षात बदल घडविण्यासाठी अधिकार देण्यात आलेत. असे प्रशांत किशोर पुढे म्हणाले, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा संधी आहे. काँग्रेस एकसंध राहिल्यास भाजपला तगडं आव्हान देऊ शकतो. सध्या भाजप ताकदवान पक्ष बनलाय. पण, तरीही पूर्व आणि दक्षिण भारतात त्यांना संघर्ष करावा लागतोय. कारण, या प्रदेशांतील सुमारे 200 जागांपैकी 50 जागाही भाजपला मिळू शकलेल्या नाहीत. यामध्ये बिहार, बंगाल, ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. असं ही यावेळी बोलताना किशोर यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Stories

भाजप खासदारपुत्राचा समाजवादी पक्षात प्रवेश

Patil_p

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षेसाठी तैनात डीसीपीला कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav

राममंदिराची बांधणी ‘नागर’ शैलीत होणार

Patil_p

केरळात दैनंदिन रुग्णसंख्या वाढलेलीच!

Patil_p

दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा

datta jadhav
error: Content is protected !!