Tarun Bharat

लोकांचे इंग्रंजी सुधारून झाला अब्जाधीश

ग्रामरली मशीन लर्निंगचा संस्थापक

तुम्ही अशा अनेक अब्जाधीश उद्योजकांच्या कहाणी ऐकल्या असतील, जे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड कष्ट करणारे असतात. परंतु कुणी तुमच्या चुका सुधारून अब्जाधीश झाल्याचे कधी ऐकले आहे का? व्याकरणाशी निगडित चुका सुधारणे आणि योग्य इंग्रजी लिहिण्यास मदत करणारी स्टार्टअप कंपनी ग्रामरलीचे दोन सह-संस्थापक अब्जाधीशांच्या यादीत सामील झाले आहेत.

ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार ग्रामरलीचे 2 सह-संस्थापक मॅक्स लिटविन आणि एलेक्स शेवचेन्को यांची एकूण मालमत्ता प्रत्येकी 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. या स्टार्टअपची सुरुवात 3 जणांनी मिळून 2009 मध्ये केली होती. आता कंपनीसोबत 600 हून अधिक कर्मचारी काम करत आहेत. वफंनीच्या दैनंदिन सक्रीय युजर्सची संख्या 3 कोटी आहे. ही कंपनी वर्षाला 5 लाख ऍप्लिकेशन्सच्या मदतीने 12 ट्रिलियन शब्दांना ऍनालाइज करते.

नोव्हेंबरमध्ये ग्रामरलीचे मूल्य 13 अब्ज डॉलर्स असल्याचे म्हटले गेले होते. याचबरोबर हे स्टार्टअप अमेरिकेच्या 10 सर्वात मूल्यान स्टार्टअप कंपन्यांमध्ये सामील झाले होते. नोव्हेंबरमध्ये कंपनीने 200 दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक निधी जमविण्यास यश मिळविले होते. ग्रामरली मशीन लर्निंगचा वापर करत इंग्रजी लिहिण्यासह स्पेलिंग चेक करणे, व्याकरण सुधारणे आणि योग्य भाषा अवंलबिण्यास मदत हेते. कंपनी कॉपी-पेस्ट डिटेक्ट करण्याचीही सेवा देते. ग्रामरलीची सेवा स्मार्टफोनसह डेस्कटॉप युजर्ससाठीही उपलब्ध आहे.

Related Stories

हुवाईच्या सीएफओंच्या सुटकेनंतर 2 नागरिकांची चीनकडून सुटका

Patil_p

सीरियामध्ये अमेरिकेचा एअरस्ट्राइक

Patil_p

श्वानांसाठीचे विशेष रेस्टॉरंट

Patil_p

कंदहार आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला

datta jadhav

तालिबानची जुलमी हुकुमशाही सुरू

Patil_p

एरिक गार्सेटी भारतातील अमेरिकेचे राजदूत?

Amit Kulkarni