Tarun Bharat

लोकांना वीज-पाण्यासह मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन

हैदराबाद निवडणुकीकरता भाजपचे घोषणापत्र : जोरदार प्रचारमोहीम

वृत्तसंस्था/ हैदराबाद

हैदराबाद महापालिका निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने पूर्ण जोर लावला आहे. भाजपने या निवडणुकीकरता गुरुवारी स्वतःचे घोषणापत्र सादर केले आहे. या घोषणापत्रात मोफत वीज आणि पाण्यासह अनेक प्रकारची आश्वासने नमूद आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे घोषणापत्र सादर करताना हैदराबादच्या लोकांना कोरोनाची लस मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. याचबरोबर शहरवासीयांना अतिक्रमणापासून दिलासा आणि पूरग्रस्तांना 25 हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या 150 जागांसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल 4 डिसेंबर रोजी लागणार आहे. दक्षिण भारतीय शहराच्या महापालिकेचा अर्थसंकल्प 5,380 कोटी रुपयांचा आहे.

भूपेंद्र यादवांना जबाबदारी

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपची कामगिरी उंचाविण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱया भूपेंद्र यादव यांना पक्षाने हैदराबाद महापालिका निवडणुकीकरता महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. भाजपने या निवडणुकीकरता अन्य राज्यांच्या नेत्यांनाही विविध कामे सोपविली आहेत. फडणवीस यांच्याकडे प्रचारात सूसूत्रता आणण्याचे काम देण्यात आले आहे.

तेजस्वी सूर्यांवर गुन्हा दाखल

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्या विरोधात तेलंगणा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. उस्मानिया विद्यापीठात अधिकाऱयांच्या अनुमतीशिवाय प्रवेश केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. विद्यापीठाच्या रजिस्ट्रारने खासदारांच्या विरोधात तक्रार नोंदविल्याची माहिती पोलीस अधिकाऱयाने दिली आहे. सूर्या यांनी विद्यापीठ परिसरात अनुमतीशिवाय सभा घेतली, याचबरोबर प्रवेशद्वार तोडून त्यांनी समर्थकांसोबत परिसरात प्रवेश केला होता असे तक्रारीत नमूद आहे.

घोषणापत्रातील ठळक मुद्दे

? 17 सप्टेंबर रोजी तेलंगणा मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला जाणार

? ग्रेटरहैदराबाद महापालिकेद्वारे शहरातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस देणार

? महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार, कुणाचेच नुकसान होऊ देणार नाही

? शहरात यंदाच्या पूरग्रस्तांना महापालिकेकडून  25 हजार रुपयांची थेट मदत करणार

? हैदराबादमधील 1 लाख लोकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर दिले जाणार

? मेट्रो आणि बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा महापालिकेकडून मिळणार

? सर्व मुलांना शासकीय शाळेत मोफत टॅब देणार, शाळा तसेच महत्त्वाच्या ठिकाणी वाय-फाय

? हैदराबाद शहरातील अनुसूचित जातीच्या लोकांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करणार

? 125 चौरस यार्डाच्या घरावर कुठलेच शासकीय शुल्क आकारले जाणार नाही

? हैदराबाद महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना स्वच्छ पेयजल मोफत उपलब्ध करणार

? मूसी नदीसाठी केंद्राकडून 10 हजार कोटी रुपयांचा निधी मिळवून देणार

? नमामि गंगा, साबरमती रिव्हरप्रंटच्या धर्तीवर मूसी नदीक्षेत्राचा विकास घडविणार

? हैदराबादमधील दारिद्रय़रेषेखालील लोकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत देणार

Related Stories

राज्यसभेत राजा विरुद्ध महाराजा

Amit Kulkarni

मुलांविरोधातील सायबर गुन्ह्य़ांमध्ये वाढ

Patil_p

एप्रिलमध्ये निर्यातीत 31 टक्क्यांची वाढ

Patil_p

नव्या संसद भवनात होणार हिवाळी अधिवेशन

Amit Kulkarni

दिल्लीतील स्फोटाची एनआयए चौकशी होणार

Patil_p

केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणं राबवून शेतकऱ्यांची लूट करतंय – राजू शेट्टी

Archana Banage