Tarun Bharat

लोकांना हवी होती ‘ममता’ पण मिळाली ‘निर्ममता’

हल्दिया / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ममता बॅनर्जी सरकारलाही फटकारले. येथील जनतेला ‘ममता’ (प्रेम) मिळण्याची अपेक्षा असताना ‘निर्ममता’ (क्रौर्य) मिळाल्याचा हल्लाबोल मोदींनी केला. गेल्या दहा वर्षात येथील लोकांचा हिरमोड झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून आता लोक भाजपच्या जवळ येत आहेत. येथे भाजपची सत्ता आल्यानंतर येथील क्रौर्य संपुष्टात आणण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारे राज्य आहे. फुटबॉलच्याच्च भाषेत बोलायचे तर तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल, बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल अशी अनेक पापमय कृत्ये ममता सरकारने केली आहे. बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला ‘राम कार्ड’ दाखवणार आहे.’’ असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी केले.

पंतप्रधान मोदी आज आसाम व पश्चिम बंगालच्या दौऱयावर आहेत. त्यांनी हल्दिया येथील एका सभेत बोलताना सर्वप्रथम उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयाबाबतची माहिती लोकांना देत मी सातत्याने तिथल्या परिस्थितीची माहिती घेत असल्याचे सांगितले. उत्तराखंडसाठी संपूर्ण देश प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

तपासातील उत्तम कामगिरीसाठी १५२ पोलीस अधिकाऱ्यांना पदक जाहीर

Amit Kulkarni

रोजगारनिर्मितीचा गाडा हळूहळू रुळावर

Patil_p

कुलगामध्ये दोन दहशतवादी ठार

Patil_p

अधिकारी झोपले होते का ?- न्यायालय

Patil_p

राजस्थानमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 7376 वर 

Tousif Mujawar

स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage
error: Content is protected !!