Tarun Bharat

लोकांमध्ये मिळून मिसळून वागणाऱया मंत्रग्नी लोबोना शुभेच्छा देताना आनंद वाटतो- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मायकल लोबो यांचा वाढदिवस साजरा

प्रतिनिधी / म्हापसा

कचरा व्यवस्थापन, ग्रामीण विकास, पोर्टबंदर अशी विविध खाती, मंत्री मायकल लोबो सांभाळत आहेत. वेगवेगळय़ा धर्माच्या, जातीच्या लोकांना ते आपलेसे मानतात. लोकांमध्ये मिळून मिसळून वागतात. येणाऱया काळात नवनवीन विकासात भर पडो. आम्ही एकत्रित राज्याचा विकास साधण्यासाठी येणारा काळ दोघांना मिळूदे. जनतेला एकत्रित करून त्यांच्या समस्यांचे निवारण करणाऱया लोकांची कामे पुढे घेऊन जाणाऱया मंत्री मायकल लोबो यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देताना खूप आनंद होतो. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. 

मंत्री मंडळातील मंत्री मायकल लोबो यांना शुभेच्छा दिल्यावर मुख्यमंत्री बोलत होते. मंत्री मायकल लोबो यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने आपल्या निवासस्थानी साजरा केला. सोशल डिस्टन्सीत त्यांच्या कार्यकर्ते चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भाजपा राज्याध्यक्ष सदानंद तानावडे, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, उत्तर गोवा अध्यक्ष महानंद अस्नोडकर, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार दयानंद सोपटे, आमदार ग्लेन टिकलो, दत्ता खोलकर, आमदार विनोद पालयेकर आदी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच आदी कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांची पत्नी डिलायला लोबो, मुलगी मलायका, पुत्र डॅनिअल लोबो यांनी मान्यवरांचे स्वागत केले. दै. ‘तरुण भारत’चे मालक किरण ठाकूर, संपादक सादर जावडेकर यांनी लोबो यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

Related Stories

भूमिपुत्र विधेयक दुरुस्तीची आवश्यकता- मंत्री मायकल लोबो

Omkar B

काणकोणात मूत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी शुद्ध पाणी पुरवू : खा. सार्दिन

Amit Kulkarni

प्रेक्षकांविना खेळतानाही जोश कमी होणार नाही

Patil_p

डिचोली तालुक्मयात जोरदार वाऱयासह पाऊस

Amit Kulkarni

वास्कोत कारची स्कुटरला धडक, महिला व मुले जखमी

Amit Kulkarni

पेडणे येथील मराठी साहित्य संमेलन यशस्वी करुया

Amit Kulkarni