Tarun Bharat

लोकायुक्तांचा आदेश हायकोर्टात रद्दबातल

प्रतिनिधी/ मडगाव

लोटलीचे तत्कालीन सरपंच तसेच लोटली पंचायतीचे सदस्य इनासियो फर्नाडिस यांना अपात्र ठरविणारा गोवा लोकायुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला.

उच्च न्यायालयाच्या न्या. नतन सरदेसाई आणि न्या. दामा नायडू यांच्या खंडपिठाने हा आदेश दिला.

न्यायालयात सादर केलेल्या याचिकेनुसार लोटली येथील फ्रॅन्की मोंतेरो यांनी गोवा लोकायुक्ताकडे एक याचिक सादर केली होती. या याचिकेवर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला आणि नंतर लोकायुक्तांनी आदेश जारी केला.

 ‘इनासियो फर्नाडिस हे आणखी आपल्या पदावर राहू शकणार नाहीत’ असा आदेश 20 सप्टेंबर 2019 रोजी गोवा लोकायुक्तानी दिला होता आणि या आदेशाला श्री फर्नाडिस यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयात यावर युक्तिवाद झाला. लोकायुक्तांनी दिलेल्या आदेशावर मुख्य सचिवानी गोवा लोकायुक्त कायदा 2011 च्या 16 ए कलमाखाली सुनावणी घ्यायला हवी होती आणि श्री. फर्नाडिस यांचे म्हणणे ऐकून घ्याला हवे होते. लोकायुक्तांच्या आदेशावर मुख्य सचिवांनी 3 महिन्याच्या आत निर्णय घ्यायला हवा होता असेही त्या कलमात होते.

मात्र 3 महिन्यांची मुदत संपून गेली तरी मुख्य सचिवांनी निर्णय न घेतल्यामुळे लोकायुक्तांचा आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी असा आदेश गोवा लोकायुक्तानी 20 सप्टेंबर 2019 रोजी जारी केला होता. या आदेशाला इनासियो फर्नाडिस यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने गोवा लोकायुक्तांचा आदेश रद्दबातल ठरविला आणि या संबंधी 31 जानेवारी रोजी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी घेण्यात येईल असे 17 जानेवारी 2020 रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

Related Stories

गोव्यात येताच सर्व खलाशांची चाचणी

Omkar B

‘सम्राट क्लबची यशोगाथा पुस्तकातून इतर सामाजिक संस्थांनी बोध घ्यावा-

Patil_p

पाच आमदार भाजप प्रवेशोत्सुक

Patil_p

डिचोली तालुक्मयात हलक्मया पावसाच्या सरी.

Omkar B

ऍडव्होकेट जनरल देविदास पांगम यांचा सत्कार

Patil_p

राजदीप नाईकच्या गाडीवरील हल्ला म्हणजे अघोषित आणीबाणी : कामत

Amit Kulkarni