Tarun Bharat

लोटेतील एक्सेल कंपनीत स्फोट

Advertisements

वार्ताहर/ लोटे

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीत रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या स्फोटाने एकच खळबळ उडाली. मात्र या दुर्घटनेत कुठल्याहीप्रकारची जीवितहानी झाली नसली तरी नजिकचे ग्रामस्थ कमालीचे भयभीत झाले आहेत.

  दरम्यान, स्फोटानंतर ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारावर धडक देत कंपनी व्यवस्थापनास जाब विचारला. या कंपनीमधील एका प्लांटमधील गॅस कीट खराब झाल्यामुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात आले.

   या कंपनीत कृषी क्षेत्रासाठी लागणारे रसायन बनवले जाते. या रसायनावर प्रक्रिया करत असताना अचानक रिऍक्टरचे झाकण उडून स्फोट झाला. स्फोटाच्या भीषणतेने नजिकचे रहिवाशी चांगलेच हादरले. स्फोटानंतर आगीचा एकच भडका उडाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. आगीचे वृत्त कळताच औद्योगिक वसाहतीतील अग्निशमक बंब व एक्सेल कंपनीतील फायरच्या पथकाने आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबतचे वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

  स्फोटानंतर कंपनीने सायरन वाजवून सतर्क न केल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रवेशद्वारावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला. या स्फोटाची औद्योगिक सुरक्षा विभागाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

Related Stories

कोकण रेल्वेच्या ‘पार्सल ट्रेन’ला प्रारंभ

Patil_p

शेर्ले येथील वाळू उत्खनन विरोधातील ही कारवाई म्हणजे वराती मागून घोडे

Anuja Kudatarkar

मेडिकल कॉलेज लवकरच पूर्णत्वाला जाणार

Omkar B

मालवण एसटी आगार येथे मराठी भाषा गौरव दिन साजरा

Anuja Kudatarkar

वनअमृत ब्रँडखाली उत्पादने

NIKHIL_N

Ratnagiri : चिपळुणात लम्पीमुळे दगावली 10 जनावरे!

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!