Tarun Bharat

लोणंदमध्ये 1.86 लाखांचा गुटखा जप्त

वार्ताहर / लोणंद :

अवैध गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी लोणंद पोलीस व अन्न औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात 1 लाख 86 हजार रूपये किंमतीचा गुटखा साठा जप्त करुन, एकास ताब्यात घेण्यात आले.

याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली माहिती अशी, शुक्रवारी लोणंद येथील गोटेमाळ परिसरात एका ठिकाणी अवैधरीत्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहीती लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल के.वायकर यांना मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभाग आणि लोणंद पोलिसांच्या टीमने छापा टाकत बंदी असलेले विमल, आर.एम.डी. व हिरा कंपनीचा 1 लाख 86 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त करुन कारवाई करून सागर नाथाजी शिंदे रा लोणंद ता खंडाळा या आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास म.पो.उनि. स्वाती पवार करीत
आहेत.

Related Stories

सातायात जुगार अड्डयावर छापा

Patil_p

कराड पालिकेत भाजप पक्षाच्या चिन्हावर लढणार

Amit Kulkarni

सोनाराला मागितली 20 लाखांची खंडणी

Patil_p

सातारा : वाईमध्ये चोरट्यांची दिवाळी

Archana Banage

कराडला कोरोना रूग्णांच्या बेडचा गोलमाल?

Patil_p

सातारा : जुन्या राजवाड्याची सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी केली स्वच्छता

Archana Banage