Tarun Bharat

लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता

वार्ताहर / लोणंद :

लोणंद नगरपंचायतच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या राष्ट्रवादीने 17 पैकी 10 जागा काबीज करत नगरपंचायतीची सत्ता एकहाती मिळवली. अत्यंत चुरशीने लढल्या गेलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने दहा जागा मिळवत बाजी मारली तर मागील पंचवार्षिक निवडणुकीत सहा जागा मिळवलेल्या काँग्रेसला अवघ्या तीन जागांवर विजय मिळवता आला. तर भाजपनेही तीन जागी विजय संपादन करून मागच्यापेक्षा एक जागा अधिक मिळवली तर जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

या निवडणूकीत विजय मिळवलेले उमेदवार पुढीलप्रमाणे प्रभाग एक – शेळके दिपाली संदीप – भाजप 541, प्रभाग दोन- बागवान आसिया साजिद – कॉग्रेस 191, प्रभाग तीन- शेळके दिपाली निलेश – कॉग्रेस 322, प्रभाग चार – शेळके सचिन नानाजी राष्ट्रवादी 545, प्रभाग पाच – शेळके भरत शंकरराव -राष्ट्रवादी 287, प्रभाग सहा- शेळके राजश्री रवींद्र – अपक्ष 205, प्रभाग सात- मधुमती पलंगे – राष्ट्रवादी 385, प्रभाग आठ- ज्योती डोणीकर- भाजप 564, प्रभाग नऊ- शिवाजीराव शेळके , राष्ट्रवादी 387, प्रभाग दहा- सिमा वैभव खरात, राष्ट्रवादी 340, प्रभाग अकरा- भरत बोडरे 327 चिठ्ठीवर विजयी घोषित , प्रभाग बारा- रशिदा इनामदार – राष्ट्रवादी 246,
प्रभाग तेरा- तृप्ती राहूल घाडगे, भाजप 121, प्रभाग चौदा- सुप्रिया गणेश शेळके – राष्ट्रवादी 737, प्रभाग पंधरा- गणीभाई कच्छी, राष्ट्रवादी 292, प्रभाग सोळा- प्रविण व्हावळ-काँग्रेस 175, प्रभाग सतरा- रविंद्र रमेश क्षीरसागर- राष्ट्रवादी 583.

प्रभाग अकरा मधील शिवसेनेचे उमेदवार विश्वास शिरतोडे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भरत बोडरे या दोघांनाही समसमान 327 मते मिळाल्याने या ठिकाणी चिठ्ठीद्वारे विजयी उमेदवार निश्चिती करण्यात आली. यामधे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासमोर समर्थ रोहित बुणगे या सात वर्षांच्या लहानग्याच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीत राष्ट्रवादीचे भरत बोडरे हे विजयी ठरले.

Related Stories

साताऱयात लोकसभेला कमळ उगवणार

Patil_p

माजी मंत्री विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे निधन

datta jadhav

सलग दुसऱया दिवशी बाधित वाढ 100 च्या खाली

Patil_p

बिअर शॉपी फोडणाऱया तिघांना अटक

Patil_p

जोतिबाची सासनकाठी नाचवताना थकल्याने तरुणाचा मृत्यू

Archana Banage

सातारा : युवकांच्या सतर्कतेमुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील चोरी टळली

Archana Banage