Tarun Bharat

लोणंद – शिरवळ रोडवरील अपघातात ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर यांचा मृत्यू

लोणंद : लोणंद ते शिरवळ  रोडवर मरीआईचीवाडी  गावचे हद्दित  अज्ञात वाहनाने पाठीमागुन धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ग्रामविकास अधिकारी श्रीकांत  क्षीरसागर रा.तरडगाव यांचा मृत्यु अज्ञात वाहनाचा शोध लोणंद पोलीस घेत आहेत.

वाठार बु? ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी श्रीकांत क्षीरसागर  हे आपले वाठार कॉलनी येथील ऑफीस कामकाज करुन मोटारसायकल क्रमांक श्प् 11 ण्ण् 7580 वरून स्वता डोक्यात  हेल्मट घालुन शिरवळ ते लोणंद – फलटण मार्गावरील  वाठार कॉलनी ते तरडगाव असा प्रवास करीत असताना मरिआईचीवाडी गावचे हद्दित पाठीमागुन कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रीकांत क्षीरसागर हेल्मेट सह डांबरी रस्त्यावर डोक्यावर आपटुन गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला जबरदस्त  मार लागल्याने मोठया प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. या वेळी बराच त्यांना उपचारासाठी कोणीही दवाखान्यात नेले . त्यानंतर काही युवकांनी त्यांना लोणंद येथे उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. लोणंद पोलीसही घटनास्थळी व दवाखान्यात दाखल झाले होते.

श्रीकांत क्षीरसागर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना पुणे येथे उपचारासाठी नेण्यात आले परंतु त्या ठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.लोणंद पोलीस अपघात करून पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. पुढील तपास सपोनि विशाल वायकर करीत आहेत.

Related Stories

साताऱ्यात ‘खड्डे का बड्डे’

datta jadhav

आनेवाडी उड्डाणपुलावर साखरेचा ट्रक पलटी

datta jadhav

सावधान दहिवडी राहणार आता पोलिसांच्या नजर कैदेत

Patil_p

थकीत एफआरपीसाठी स्वाभिमानीचा ग्रीन पॉवरला दोन दिवसांचा अल्टिमेटम…

Omkar B

सातारच्या मातीत रग, पण मार्गदर्शनाचा अभाव

datta jadhav

नैसर्गिक प्रवाह बदलल्याने ओढ्याचे पाणी खासदारांच्या घरात

datta jadhav