Tarun Bharat

लोणावळय़ातील वृद्धेच्या खुनाचा तीन दिवसात उलगडा

आरोपींना राजस्थानातून अटक : अन्य एक संशयित ताब्यात

 लोणावळा / वार्ताहर :

येथील द्वारकामाई हाऊसिंग सोसायटी या उच्चभ्रू सोसायटीमध्ये भरदिवसा घरात घुसून रेशम पुरुषोत्तम बन्सल (वय 70) या वयोवृद्ध महिलेचा खून व जबरी चोरी करुन राजस्थानला पलायन केलेल्या आरोपींना तीन दिवसात अटक करण्यात लोणावळा शहर पोलीस व एलसीबीच्या पथकाला यश आले आहे. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर लोणावळा पोलिसांनी तात्काळ तपासयंत्रणा कार्यान्वित करत आठ तासात संशयित आरोपींचे नावे व फोटो निष्पन्न केले.

अशोककुमार सरगरा (वय 20, रा. मेडाउपरला, ता. जि. जालोर, राजस्थान) व जगदिशकुमार सरगरा (वय 19, रा. मेडाउपरला, ता. जि. जालोर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, तर अन्य एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

काँवत म्हणाले, आरोपी अशोककुमार हा पुरुषोत्तम बन्सल यांच्या दुकानात कामाला होता. नंतर काम सोडून तो बाजार भागात मिलन स्वीट होममध्ये आचारी म्हणून कामाला लागला होता. बन्सल यांच्या दुकानात काम करताना तो जेवणाचा डब्बा आणण्याकरिता त्यांच्या घरी जात असे, त्याला घरात कपाट कोठे आहे, दरवाजे कोठे आहेत, सीसीटिव्ही कॅमेरे, पैसे व दागिने कोठे ठेवले जातात, याची माहिती होती. दुकानात असताना बन्सल यांच्या तोंडून अनेक वेळा त्याने घरात किती पैसे आहेत, याबाबत ऐकलेले असल्याने बन्सल यांच्या घरात मोठी चोरी करुन पोबारा करण्याचा कट त्याने मिलन स्वीटमध्ये काम करणारा जगदिशकुमार जोदाजी यांच्या सोबत आखला होता. त्यानुसार त्यांनी 2 जानेवारी रोजी बहाणा करत घरात प्रवेश केला. तसेच रेशम याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर कपाट उचकटून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 2 लाख 82 हजाराचा मुद्देमाल लंपास केला असल्याचे पुरुषोत्तम बन्सल यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यापैकी रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 83 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडे आढळून आला आहे.

Related Stories

आचेगांवातही खगोलप्रेमी व विद्यार्थांनी अनुभवले सूर्यग्रहण

Archana Banage

स्वामी सेवा समजूनच नागरिकांची कामे करू : वळसे-पाटील

Archana Banage

अब्दुल सत्तारांकडून राज्यमंत्रिपदाचा राजीनामा

prashant_c

सोलापूर : गौडगाव,धामणगाव रोडवर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा टॅम्पो पकडला

Archana Banage

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे

Archana Banage

एनआयएप्रकरणी 6 फेबुवारीला सुनावणी

prashant_c