Tarun Bharat

लोहिया मैदानावरील पुतळा, स्मारकाच्या हानीची आज पाहणी

18 जून क्रांतिदिन समितीकडून मुख्याधिकाऱयांची भेट

प्रतिनिधी /मडगाव

मडगावातील ऐतिहासिक लोहिया मैदानावरील थोर स्वातंत्र्यसेनानी डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा तसेच स्वातंत्र्यसैनिक स्मारक सल्लागाराच्या ताब्यात असल्याचे मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी स्पष्ट केल्यानंतर सदर पुतळा व स्मारकाला केवढय़ा प्रमाणात हानी पोहोचली आहे त्याची आज मंगळवारी पाहणी करण्याचे ठरविण्यात आले आहे.

18 जून क्रांतिदिन समितीचे अध्यक्ष व माजी नगरसेवक अविनाश शिरोडकर तसेच इतर सदस्यांनी सोमवारी सकाळी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकाऱयांची भेट घेतली. यावेळी सचिव ऍड. रामनाथ खरंगटे, खजिनदार विनायक मोर्डेकर, स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुदेसाई, विष्णू आंगले तसेच रजनी रायकर, महेश केणी, सीताराम केरकर हे उपस्थित होते. याप्रसंगी सदर पुतळा व स्मारक सल्लागाराने दुरुस्तीसाठी दिलेले असल्यास एकंदर हानीची पाहणी करण्यासाठी सल्लागाराकडून वेळ घेण्यात आली. त्यानुसार आज मंगळवारी सकाळी 11 वा. सदर पाहणी करण्याचे ठरविण्यात आले आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले. सदर पाहणी केल्यानंतर यासंदर्भात भाष्य करू, असे ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी स्थानिक आमदार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी पुतळा व स्मारक गायब झाल्याचे विधान करताना भाजपा सरकारवर शरसंधान केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी सदर पुतळा व स्मारक लोहिया मैदानाचे सौंदर्यीकरण करणाऱया सल्लागाराच्या ताब्यात असून त्यावर पॉलिशिंग व अन्य दुरुस्तीकाम केले जात असल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

मुक्तीदिन साजरा करण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावे

लोहिया मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे काम गोवा मुक्तीदिनापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, याकडे शिरोडकर यांनी लक्ष वेधले. 18 डिसेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करून मैदान 19 डिसेंबर साजरा करण्यासाठी उपलब्ध होईल यासाठी पालिकेने पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱयांकडे केली.

Related Stories

डिचोली साखळीत पावसाच्या सरी

Amit Kulkarni

फाळकेंनी भारतीय चित्रपटक्षेत्रात आत्मनिर्भरता आणली

Amit Kulkarni

मतदारसंघात प्रचाराला येऊ नका असे फोन आले; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Archana Banage

तळावली येथील वादग्रस्त मोबाईल टॉवरचे काम जोरात

Amit Kulkarni

वास्कोतील कोरोना स्थितीचा पंचायतमंत्र्यांसमवेत बैठकीत आढावा

Patil_p

आपची पणजीत डेंग्यू विरोधी अनोखी मोहीम

Amit Kulkarni