Tarun Bharat

वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी

वार्ताहर / कबनूर

शेकडो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. अशा वंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती देणे बाबत ची व्यवस्था करावी अशी मागणी कबनूर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे संबंधितांना तश्या सूचना देऊन महिन्याभरात शिष्यवृत्ती वितरण होईल अशी ग्वाही मंत्री सतेज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिली.

कोरोना महा संकटामुळे विद्यार्थ्यांच्या वर देखील या महामारी चा वाईट असा परिणाम झालेला आहे. शेकडो विद्यार्थी अशाच अडचणीत सापडले आहेतपुढील शिक्षण घेणे त्या विद्यार्थ्यांना अडचणीचे झालेले आहे. लोक डाऊन मुळे यंदा थोडे लवकरच शैक्षणिक वर्ष 2019. 20 हे वर्ष संपले आहे .आतापर्यंत राज्यातील सर्वच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळणे अपेक्षित होते परंतु आज पर्यंत देखील राज्यातील हजारो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून खऱ्या अर्थाने वंचित आहेत. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने यावर गंभीर विचार करावा. छत्रपती राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिष्यवृत्ती वितरित करण्यास इतका विलंब होणे निंदनीय आहे याची सरकारने दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रलंबित या समस्या बाबत कबनूर युवक काँग्रेस च्या शिष्टमंडळाने नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. यावर मंत्री पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्याशी फोनद्वारे संपर्क साधून माहिती घेतली व त्यांना योग्य त्या सूचना केल्या. येत्या महिन्याभरात शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यावेळी इचलकंजी शहर काँग्रेस अध्यक्ष संजय कांबळे नगरसेवक राहुल खंजिरे शशांक बावचकर कबनूर युवक काँग्रेस अध्यक्ष महेश कांबळे उपाध्यक्ष प्रसाद चव्हाण रियाज ची कोडे अकबर सनदी प्रशांत लोंढे आधी उपस्थित होत

Related Stories

कोल्हापूर : माजी उपमहापौर आनंदराव सुतार यांचे निधन

Archana Banage

कोंबड्यांना लंम्पीस्किनची लागण ही निव्वळ अफवा

Kalyani Amanagi

कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर ओसरण्याची गती होतेय संथ

Archana Banage

शिवसेना खासदाराला एक वर्षाच्या तुरूंगवास, पावणेदोन कोटींचा दंड

datta jadhav

सोनिया गांधींनी बोलावली आज विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक ; मुख्यमंत्री ठाकरे राहणार उपस्थित

Archana Banage

मोटरसायकल अपघातात उंदरवाडीचा तरुण ठार, एक जखमी

Archana Banage