Tarun Bharat

वंटमुरी कॉलनीत घरे बांधून द्या

प्रतिनिधी /बेळगाव :

गेल्या अनेक वर्षांपासून वंटमुरी कॉलनी परिसरात गरीब कुटुंबे झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. पक्की घरे बांधून मिळावीत, यासाठी त्यांनी अनेक वेळा निवेदन दिले. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्हाला घरे बांधून द्यावीत, या मागणीसाठी आम्ही पुन्हा निवेदन देत आहोत. जर ही मागणी मान्य झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा जयभीम ओमसाई संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आला आहे.

वंटमुरी कॉलनी येथे आम्हाला घरे बांधून द्यावीत. गोरगरीब जनतेने घरांसाठी अनेकवेळा अर्ज केले आहेत. मात्र, गरिबांऐवजी दुसऱयांनाच घरे बांधून दिली जात आहेत. जाणूनबुजून हा प्रकार सुरू आहे. तेव्हा तातडीने सर्व्हे करून आम्हाला घरे बांधून द्यावीत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू ठोंबरे, चरणसिंग धमुणे, बाळेश रंगापुरी, मरू तिवारी, गिरीजा चौगुले, सुशील चौगुले यांच्यासह दलित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.   

Related Stories

अंगणवाडी सेविकांचे तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Patil_p

काम अर्धवट तरी अधिकारी गप्प का?

Amit Kulkarni

धर्मांतर बंदी विधेयक मांडण्याची सत्ताधारी भाजपची तयारी

Amit Kulkarni

काव्यसंमेलन, कथाकथनाला रसिकांची दाद

Amit Kulkarni

हुबळी स्पोर्ट्स क्लब-युनियन जिमखाना सामना ‘टाय’

Amit Kulkarni

अंडय़ांपेक्षा केळी-शेंगदाणा चिक्कीला मागणी

Amit Kulkarni