Tarun Bharat

‘वंदे भारत मिशन’ चा तिसरा टप्पा : 15 तासात एअर इंडियाच्या 22 हजार तिकिटांची विक्री

Advertisements

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


लॉक डाऊनमुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी तसेेेच भारतात अडकलेेेल्या विदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पोहोचवण्यासाठी भारत सरकारच्या वतीने वंदे भारत मिशन नावाने मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वंदे भारत मिशनच्या तिसऱ्या टप्प्यात एअर इंडियाने शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजल्यापासून तिकीट विक्री सुरू केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजेच फक्त 15 तासातच 22 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. कंपनी कडून सांगण्यात आले की, वेबसाईटवर सहा ते सात टक्के अधिक ट्रॅफिक आहे. यामध्ये अमेरिका, कॅनडा, युके आणि युरोपसाठी अधिक बुकिंग करण्यात आले आहे. फ्लाईट बुकिंग सुरू झाल्यावर केवळ दीड – दोन तासातच एअर लाईनच्या वेबसाईटला सहा कोटी हिट्स मिळाले आहेत. 


पहिल्या दोन तासातच केवळ वेबसाईटच्या माध्यमातून 17 जागांचे बुकिंग झाले होते. तसेच कंपनीने सांगितले की, येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असेल, त्या ठिकाणांसाठी अधिक सीट उपलब्ध करून दिल्या जातील. 


दरम्यान, सध्या संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. भारत देशात तर कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 46 हजार 628 वर पोहचली असून मृतांची संख्या 6929 एवढी आहे. 

Related Stories

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, घटनांचे घड्याळ आता उलट फिरवणार का ?…

Abhijeet Khandekar

भारतीय विद्यार्थ्याला नासाच्या स्पर्धेत विजेतेपद

Patil_p

सीबीआयकडून चित्रा रामकृष्ण यांच्या सल्लागाराला अटक

Archana Banage

“मुख्यमंत्र्यांनी शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे”

Archana Banage

कर्नाटकने पश्चिम महाराष्ट्राचा ऑक्सिजन रोखला

Archana Banage

दिल्ली, आंध्रप्रदेशमध्ये मद्यदरात 75 टक्के वाढ

Patil_p
error: Content is protected !!