Tarun Bharat

वकिलांसमोरही कोरोनाची मोठी समस्याच

मदत करणे महत्वाचेच, मदतीचा ओघ सुरुच

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाऊन झाल्यानंतर वकिलांसमोरही मोठी समस्या निर्माण झाली आहे. ज्ये÷ वकिलांनी आर्थिक मदत केली. ती मदत ज्युनिअर वकिल तसेच गरजावू वकिलांना देण्यात आली. बेळगाव बार असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयामुळे वकील वर्गातूनच नाही तर संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.

कोरोनामुळे गेले 15 दिवस झाले न्यायालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. वकील देखील रोजंदारीमध्येच मोडला जातो. दररोज काम केल्यानंतर त्यांची चुल पेटते. काही वकील बऱयाच वर्षापासून न्यायालयामध्ये कामकाज करत आहेत त्यामुळे ते बऱयापैकी सधन आहेत. मात्र नवीन आलेल्या वकिलांना आपला जम बसविण्यासाठी किमान 5 ते 6 वर्षे काम करावे लागते. त्यानंतरच या सेवेमध्ये जम बसतो. बेळगाव न्यायालयामध्ये जवळपास 1500 च्या आसपास वकील दररोज कामकाज पाहतात.

सध्या स्पर्धात्मक युग आहे. आपल्या परीने प्रत्येक जण काम करत असतो. पक्षकारांना न्याय मिळवून देत असतात. मात्र प्रत्येकालाच काम मिळते असे नाही. बऱयाचवेळा काही वकील दिवसभर काम करुन देखील त्यांना अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळते. सध्याच्या महागाईमध्ये त्या उत्पन्नातून कुटुंब व मुलांचा खर्च चालविणे कठीण जात आहे. आता कामकाज बंद झाल्यामुळे अनेक वकील अडचणीत आले आहेत. त्यामुळेच त्यांना ही मदत बार असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

बार असोसिएशनला ऍड. अलोक बेल्लद 20 हजार, ऍड. शामसुंदर पत्तार त्यांची पत्नी ऍड. नागरत्ना पत्तार यांनी 10 हजार रुपये दिले. ऍड. हलाप्पा सवसुद्दी, ऍड. आर. जी. पाटील, ऍड. यालक्की शेट्टर यांनी प्रत्येकी 5 हजार तर ऍड. आर. के. पाटील, ऍड. आर. पी. पाटील यांनी प्रत्येकी 3 हजार, ऍड. प्रभू यतनट्टी यांच्यासह इतर वकिलांनीही मदत केली आहे.

अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ

वकीलांना समाजामध्ये वेगळे स्थान असते. समाजाला वाटते की वकील म्हणजे श्रीमंत. मात्र तसे नसते. तर प्रत्येकाच्या बाबतीत श्रीमंती समजणे चुकीचे आहे. बऱयाचवेळा काही जणांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांना बऱयाच अडचणी भेडसावत असतात. अशा वकीलांना आपण मदत करणे हे ज्ये÷ वकिलांचे कर्तव्य आहे. त्यामुळेच मी स्वतः 1 लाख रुपये देवून अन्नधान्य वितरणाला हातभार लावला आहे. इतर वकिलांनीही याला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद दिला आहे.

जनरल सेपेंटरी आर. सी. पाटील

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर न्यायालयीन सर्व कामकाज ठप्प झाले. न्यायालय बंद झाल्यामुळे पक्षकार तसेच इतर नागरिक न्यायालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे वकिलांसमोरही मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळेच आम्ही अन्नधान्य वितरणाचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ऍड. जी. ए. हिरेमठ

बार असोसिएशनने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण यामुळे अनेक वकिलांना जीवनावश्यक वस्तु मिळाल्या आहेत. लॉकडाऊन झाल्यामुळे अनेकांना समस्या निर्माण झाली होती. मात्र बार असोसिएशनने ती समस्या दूर केली. हे कौतुकास्पद आहे.

ऍड. प्रमिला हंपन्नावर

कोरोनामुळे सर्वत्रच भितीचे वातावरण पसरले आहे. वकिलांवरही वाईट वेळ आली आहे. ती प्रत्येकाने जाणली आहे. ज्ये÷ वकिलांनी मदत करुन गरजू व गरीब वकिलांना हातभार लावला आहे, ही बाब अत्यंत चागली आहे. प्रत्येकानेच अशी मदत करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ऍड. ए. बी. नेसर्गी

संपूर्ण देशावरच मोठे संकट आले आहे. त्याचा सामना संघटीतपणे करणे गरजेचे आहे. जात, भेद, सर्व विसरुन मदत केली पाहिजे. बेळगाव बार असोसिएशननेही यासाठी पाऊल उचलले आणि त्यामुळे अनेक वकिलांना त्याचा फायदा झाला आहे.

Related Stories

रामदुर्ग तालुक्यात 1383 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद

Patil_p

महापौर-उपमहापौर आज फैसला

Sandeep Gawade

बेळगावात धुडगूस घालणारी जोडगोळी गजाआड

Amit Kulkarni

हुबळी येथील चंद्रशेखर गुरुजी हत्या प्रकरणी दोघांना अटक

Tousif Mujawar

ईश्वरप्पा यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

Archana Banage

वडगाव-जांबोटी येथे भरदिवसा घरफोडी

Amit Kulkarni