Tarun Bharat

वकिलांसाठी लस मोहीम सुरूच

शनिवारीही 100 हून अधिक जणांना दिली लस

प्रतिनिधी/ बेळगाव

न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यामुळे वकील कामाला लागले आहेत. कोरोना काळात वकिलांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. कोरोनाची अनेकांना लागण झाली, अनेकांचा मृत्यूदेखील झाला. त्यामुळे वकीलांना लस प्रथम द्यावी यासाठी बेळगाव बार असोसिएशन आणि कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य विनय मांगलेकर यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत.

शनिवारी लस मोहीम राबविण्यात आली. जवळपास 100 हून अधिक जणांना लस देण्यात आली. वकील तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही लस देण्यात आली. काही जणांनी पहिली लस तर काही जणांनी दुसरी लसही घेतली. अत्यंत नियोजनबद्धरित्या गेल्या महिन्याभरापासून ही मोहीम राबविण्यात आली आहे.

यावेळी कर्नाटक राज्य बार असोसिएशनचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर, बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, सदस्य ऍड. पी. के. पवार, सचिन शिवण्णावर, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. अमृत कोल्हटकर, ऍड. श्रीकांत पवार, ऍड. कमलकिशोर जोशी, सदस्य ऍड. कमलेश मायाण्णाचे यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

Related Stories

अकोळ येथे 112 क्रमांकाची जागृती

Patil_p

पोलिसांवर आक्रमण करणाऱया समाजकंटकांना शोधा : किरण जाधव

Amit Kulkarni

चित्रपटगृहे खुली झाली : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली

Patil_p

बेळगाव-शेडबाळ पॅसेंजर 12 ऑक्टोबरपर्यंत रद्द

Amit Kulkarni

कोरे गल्लीतील दूषित पाण्याबाबत कायमचा तोडगा काढा

Amit Kulkarni

बीएससी, के. आर. शेट्टी, जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni