Tarun Bharat

वकीलांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर ‘छपाक’ बंद

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

दीपिका पदुकोणची प्रमुख भूमिका असलेल्या ‘छपाक’ चित्रपटाच्या निर्मात्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने आज दणका दिला आहे. न्यायालयाने ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा भट्ट यांना चित्रपटात श्रेय देण्याचे आदेश निर्मात्यांना दिले आहेत. पीडितेच्या वकीलांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीनंतर हा चित्रपट दाखवता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती प्रतीभा एम.सिंग यांनी आज या संदर्भात निकाल दिला.

ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांच्या वकील अपर्णा सिंग यांच्याकडून घटनेची माहिती घेतली गेली. परंतु त्यांना चित्रपटात श्रेय का देण्यात आलं नाही, असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयानं चित्रपटाच्या निर्मात्यांना केला होता.

दरम्यान, ऍसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवालच्या वकिलाने सिनेमात पेडिट न दिल्यामुळे सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी याचिकेद्वारे केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती प्रतीभा सिंग यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.

 

Related Stories

‘लव्ह जिहाद’प्रकरणी आता हरियाणातही कडक कायदा

Patil_p

मुंबई महापालिकेच्या वार्ड फेरबदलास स्थगिती

Patil_p

बनावट वृत्तांमुळे सत्याची शिकार

Patil_p

ए. राजा विरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

Patil_p

कुंभमेळा प्रतिकात्मक ठेवा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

datta jadhav

लष्कराच्या इंजिनिअर्सनी 72 तासात गलवान नदीवर उभारला पूल

datta jadhav