Tarun Bharat

वच्छी म्हणतेय पोलिसांची कदर करा

Advertisements

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱया पर्वावरदेखील पहिल्या पर्वाप्रमाणेच प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेत वच्छीची भूमिका साकारणारी अभिनेत्री संजीवनी पाटील अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नकारात्मक भूमिका असलेली वच्छीची व्यक्तिरेखा अगदी खरी वाटावी इतक्या सहजपणे संजीवनी ती साकारते. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे
लॉकडाऊनमध्ये मालिकांचे चित्रीकरणदेखील बंद असल्यामुळे सर्व कलाकार घरीच आहेत. कठीण परिस्थितीत स्वतःचा विचार न करता पोलीस बांधव मात्र अहोरात्र काम करून आपली सेवा करत आहेत. अशातच पोलिसांना मारहाण झालेल्या काही घटना पुढे आल्या. वच्छी म्हणजेच संजीवनी पाटील यांचे पती पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत. पोलिसाची पत्नी या नात्याने संजीवनी या घटनांवर व्यक्त झाली. याबद्दल बोलताना संजीवनी म्हणाली, कठीण व अडचणीच्या प्रसंगात पोलीस खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे आपण या कोरोनापासून वाचण्यासाठी आणि पोलिसांना सहकार्य करण्यासाठी घरीच थांबलं पाहिजे. सरकारी आदेशांचे पालन केलं नाही तर याहून भयावह परिस्थिती ओढवेल. आपलंच रक्षण करणाऱया पोलिसांना मारहाणीच्या घटना समोर आल्यावर खूप संताप येतो. सर्वसामान्यांचा जीव वाचवण्यासाठी पोलीस, डॉक्टर आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी दिवसरात्र झटत आहेत. हे लोक त्यांच्या घरच्यांसोबत जरासुद्धा वेळ घालवत नाहीत आणि अशातच काही लोक ऐकत नसल्यामुळे पोलिसांच्या कामात भर टाकतात.

Related Stories

गस्तमध्ये झळकणार सैराटमधील बाळ्या

Patil_p

अलायाच्या खासगी आयुष्यासंबंधी चर्चा होणारच

Patil_p

‘द फेम गेम’चा ट्रेलर प्रदर्शित

Amit Kulkarni

तुमच्या तोंडात साखर पडो

Patil_p

अनन्या अन् ईशान करत आहेत परस्परांना डेट

Patil_p

नुसरतने पूर्ण केले ‘छोरी’चे शूटिंग

Patil_p
error: Content is protected !!