Tarun Bharat

वटवृक्ष स्वामी मंदिरातील स्वामींचे दर्शन पुन्हा बंद

अक्कलकोट / प्रतिनिधी

अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी अखेर नाताळ सुट्टया, दत्त जयंती, व नुतन वर्षानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी यंदा नाताळ सणाची सुट्टी, शनिवार दिनांक २६ व रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सलग शासकीय सुट्टया आहेत. मंगळवार दिनांक २९/१२/२०२० रोजी श्री दत्त जयंती आहे.

गुरूवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी नुतन वर्षाची सुरूवात इत्यादी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेवून कोरोना संसर्गाचा फैलाव होवू नये म्हणून प्रशासनाने गुरूवार दिनांक २४/१२/२०२० च्या मध्यरात्री पासून शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे व भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचेलेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.

त्यानुसार आज दिनांक २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत वटवृक्ष मंदीर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहीती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरीता मंदीराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी स्वामी भक्तांना केले आहे.

Related Stories

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Archana Banage

आता व्हॉट्सअॅप ग्रुपवरील आक्षेपार्ह मेसेजसाठी ऍडमिन जबाबदार नाही!

Archana Banage

सोलापूर : तत्कालीन मनपा आयुक्त व नगरअभियंता यांच्यावर फ़ौजदारी गुन्हे दाखल करा

Archana Banage

बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील रेशन दुकान निलंबित

Archana Banage

सोलापूर : क्रांती दिनी आडम मास्तर व अँड.एम.एच. शेख यांच्यासह 500 कार्यकर्ते अटक

Archana Banage

सोलापूर : बार्शी शहरासाठी राबवणार ‘वैराग पॅटर्न’ : प्रांताधिकारी निकम

Archana Banage