Tarun Bharat

वडगावमध्ये स्थापन होणार किडवाई कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र

आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी विधानसभेत दिली माहिती

प्रतिनिधी /बेंगळूर

राज्य सरकारने किडवाई कॅन्सर वैद्यकीय संस्थेचे विभागीय केंद्र बेळगावमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार 2022-23 या वर्षातील अर्थसंकल्पामध्येही यासंबंधीची घोषणा करून 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हे हॉस्पिटल वडगावमध्ये उभारण्याचा विचार सुरू आहे. याकरिता योग्य जागेचा शोध सुरू असून यंदाच हे कॅन्सर इस्पितळाचे प्रादेशिक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली.

अर्थसंकल्पावरील प्रश्नोत्तर चर्चेत सहभागी होताना ते म्हणाले, बेळगाव जिल्हय़ात वडगावमध्ये किडवाई कॅन्सर हॉस्पिटलचे केंद्र स्थापन करण्याबाबत विचार केला जात आहे. यासाठी आरोग्य खात्याकडून अनुकूल जागेचा शोध घेतला जात आहे. ही जागा उपलब्ध झाल्यानंतर या वर्षीच 50 कोटी रु. खर्चुन इस्पितळ निर्माण करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

बेंगळूरमधील किडवाई मेमोरियल इन्स्टिटय़ूट ऑफ ओन्कोलॉजीच्या धर्तीवर वडगावमध्ये केंद्र स्थापन केले जाईल. या ठिकाणी कॅन्सरशी संबंधित सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. यामुळे उत्तर कर्नाटकातील जनतेला अनुकूल होणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

किडवाई कॅन्सर हॉस्पिटलची मुख्य शाखा बेंगळूरमध्ये असून राज्यातील कॅन्सरग्रस्तांना उपचारासाठी बेंगळूरला जावे लागते. लांब पल्ल्याचा प्रवासामुळे त्यांची होणाली दमछाक कमी करण्यासाठी बेळगाव, मलनाड भाग, किनारपट्टी आणि हैदराबाद-कर्नाटक भागात या इस्पितळाची केंद्रे सुरू करण्याची विनंती मागील वर्षी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. याच दखल घेत उत्तर कर्नाटकातील जनतेला अनुकूल होण्यासाठी या इस्पितळाचे प्रादेशिक केंद्र बेळगावसाठी मंजूर करण्यात आले आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अर्थसंकल्पातही या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

Related Stories

येळ्ळूर, राजहंसगड परिसराला पावसाने झोडपले

Patil_p

रेल्वेट्रकला विद्यार्थ्यांचा अखेर बायबाय

Amit Kulkarni

जय किसान भाजीमार्केट रद्दसाठी पुन्हा आंदोलन

Amit Kulkarni

सांगली-कोल्हापूरच्या प्रवाशांची गैरसोय

Amit Kulkarni

हिंडाल्कोनजीक दिवसाही पथदीप सुरूच

Amit Kulkarni

अनगोळ पशुवैद्यकीय दवाखान्यालाच उपचाराची गरज

Patil_p