Tarun Bharat

वडगाव-उद्यमबाग परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

प्रतिनिधी /बेळगाव

दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दि. 13 रोजी शहापूर, वडगाव, अनगोळ व उद्यमबाग परिसरातील वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.

शहापूर येथील भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवाण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळ रोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, बस्ती गल्ली, राजवाडा कंपाऊंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, मेघदूत सोसायटी, नाथ पै सर्कल, शहापूर रोड, नेकार कॉलनी, निजामियानगर, रयत गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर,  कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संत मीरा शाळा रोड, अनगोळ-वडगाव रस्ता, गुलमोहर कॉलनी, समृद्धी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, केएलई येळ्ळूर रोड, आदर्शनगर, हिंदवाडी जेल शाळा रोड, अन्नपूर्णेश्वरीनगर, गणेशनगर, खानापूर रोड, उद्यमबाग औद्योगिक वसाहत, राणी चन्नम्मानगर, तिसरे रेल्वेगेट, वसंत विहारनगर, सुभाषचंद्र कॉलनी, उत्सव हॉटेल, देवेंद्रनगर, महावीरनगर, ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, गुरुप्रसाद कॉलनी, मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वतीनगर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतनमाळ आदी परिसरात 13 रोजी वीजपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमकडून कळविण्यात आली आहे.

Related Stories

चेंबरवर झाकण नसल्याने वाहनधारकांना धोका

Amit Kulkarni

कित्तूर उत्सवाचे थाटात उद्घाटन

Patil_p

रेल्वेस्थानकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या

Amit Kulkarni

शिवाजी महाराजांची मूर्ती शिमोग्याला रवाना

Amit Kulkarni

मच्छे औद्योगिक वसाहत पथदीपांच्या प्रतीक्षेत

Amit Kulkarni

वनविभागाकडून होणारा नाहक त्रास थांबवा

Amit Kulkarni