Tarun Bharat

वडगाव मंगाई मंदिरकडे जाणाऱया रस्त्यावर बॅरिकेडस्

प्रतिनिधी/ बेळगाव

यात्रेनिमित्त मागील महिन्याभरापासून गाऱहाणा घालून मंगळवार व शुक्रवार वार पाळण्यात येतात. तसेच यात्रेच्या वेळी स्थानिक रहिवाशांसह भाविक ओटी भरण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी करतात. यात्रा रद्द केल्यानंतरही ओटी भरण्यासाठी भाविक गर्दी करण्याची शक्मयता आहे. या पार्श्वभुमिवर परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून मंगाई मंदिरकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणुचा प्रसार झाल्याने दररोज रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आवश्यक खबरदारी घेऊन देखील कोरोनाची लागन होत आहे. तसेच सामाजिक अंतर राखण्याकडेही नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभुमिवर यात्रा आयोजित करण्यास जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच यात्रेवेळी मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे परिसरात होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरकडे जाणाऱया मार्गावर बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत.

कोरोनाचे संकट गढद होत चालल्याने वडगाव येथील मंगाई यात्रा देखील यंदा रद्द करण्याचा निर्णय यात्रा समितीने घेतला आहे. वडगावची ग्राम देवता श्री मंगाई देवीची यात्रा दरवषी आयोजित करण्यात येते. यंदा दि. 14 व 15 रोजी यात्रा आयोजित करण्यात येणार होती.  प्रशासनाने घातलेल्या निमयांचे पालन होत नाही. तसेच भाविक आणि नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा विचार करून यंदाची यात्रा रद्द करण्यात आली आहे, याची नोंद वडगाव परिसरातील रहिवाशांनी आणि भाविकांनी घ्यावी तसेच सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन श्री मंगाई देवी यात्रा कमीटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Stories

पाच वर्षात खडकलाटचा कायापालट करणार

Patil_p

सोमवारी दिलासा, मात्र 984 अहवालांची अद्याप प्रतीक्षा

Patil_p

खोदलेल्या नवीन काँक्रीटच्या रस्त्याची केली दुरुस्ती

Patil_p

कायदा मंत्री मधुस्वामी यांची बार असोसिएशनला भेट

Amit Kulkarni

गार्डनर्स सोसायटीसमोरच भिंत बांधण्यास सुरुवात

Amit Kulkarni

हुतात्मा दिन गांभीर्याने पाळा

Amit Kulkarni