Tarun Bharat

वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी

प्रतिनिधी/ बेळगाव

एकीकडे खासगी इस्पितळात लसीकरण मोहीम थांबवण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथे येणाऱया सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन लस घेण्यास सांगण्यात आले तर दुसरीकडे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्धच नाही आणि तालुका केंद्रामध्ये लस उपलब्ध असली तरी तेथे गर्दीमुळे कोविडच्या सर्वच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.

कोणत्याही परिस्थितीत लस घेणे आवश्यक असल्याने नागरिक गर्दी करत आहेत. पण हेच नागरिक नियमांचे पालन करण्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करत आहेत. या सर्व परिस्थितीचा ताण मात्र आरोग्यसेवकांवर वाढतो आहे. लस उपलब्ध होती तेव्हा कोणीही गर्दी केली नाही आणि आता कोविडची लाट सुरू झाल्यानंतर प्रत्येकालाच लस घेणे आवश्यक वाटू लागले आहे. ही बाब अत्यंत साहजिक असली तरी आपल्यामुळे दुसऱयांचे आरोग्य धोक्मयात येणार नाही, हे लक्षात घेणे आवश्यक असताना नागरिक मात्र निष्कारण आरोग्यसेवकांचा जीव धोक्मयात आणत आहेत.

वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने कोविड-19 च्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाला. आशा कार्यकर्त्या, आरोग्यसेविका यांनी सातत्याने नागरिकांना सामाजिक अंतर पाळा, असे सांगूनही लोकांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले. ‘ताबडतोब लस द्या’, अशी मागणी करणाऱया नागरिकांना किती लस उपलब्ध आहे, याचा अंदाज नाही. मात्र, लसीकरण मोहिमेत विलंब झाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे तक्रार केली. परिणामी आरोग्य खात्याच्या अधिकाऱयांनी आशा कार्यकर्त्या आणि परिचारिकांची चांगलीच हजेरी घेतली.

‘प्रामाणिकपणे काम करूनही नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे आम्हाला बोलणी खावी लागतात’, असे एका परिचारिकेने डोळय़ांत पाणी आणून ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. दुसरीकडे बरीचशी प्राथमिक आरोग्य केंदे कुलूपबंद असून तेथे ताटकळत थांबणाऱया नागरिकांना कोणतीच माहिती मिळत नाही. ऍप डाऊनलोड करा, तुमचे नाव नोंदवा, असे सांगण्यात येते. पण त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आहेत. शिवाय अनेकांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत आणि ऍप कसे डाऊनलोड करावे? याची माहिती नाही. त्यांनी नेमके काय करावे? हे सांगण्यास कोणताही अधिकारी तेथे उपलब्ध नाही.

एकूणच बेळगावमध्ये सुरू असणाऱया लसीकरण मोहिमेमध्ये सुसूत्रता आणि शिस्त या दोन्हींचा अभाव आहे. या एकूण परिस्थितीचा फटका आरोग्यसेविका आणि आशा कार्यकर्त्यांना बसतो आहे. नागरिकांना त्यांच्या आरोग्याची काळजी आहे, तसेच आम्हालासुद्धा त्यांच्या आरोग्याची काळजी आहे. आम्ही त्यांना सतत नियम पाळा, असे सांगूनही ते ऐकत नाहीत. त्यातच मधुमेही किंवा उच्च रक्तदाब असणारे नागरिक जर रांगेत असतील तर त्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आम्हालाच काळजी घ्यावी लागते. जितक्मया लस उपलब्ध आहेत तितक्मया सर्व देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणाने करत आहोत. परंतु, नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आरोग्यसेविकांचे म्हणणे आहे.

एकीकडे नागरिक करत असलेले नियमांचे उल्लंघन आणि दुसरीकडे आशा कार्यकर्त्या व आरोग्यसेविकांचे मनोधैर्य खचणार नाही याची जबाबदारी यामुळे तालुका आरोग्य केंद्रातील डॉक्टरांवर सुद्धा ताण आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱयांनी या सर्व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व तालुका आरोग्य केंद्रातील अधिकारी आणि डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱयांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे आणि या व्यवस्थेत सुसूत्रता आणावी, अशी मागणी होत आहे.

शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात यावी

दरम्यान, याबाबत महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्याशी चर्चा करता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये होणारी गर्दी टाळण्याकरिता सध्या शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या शाळांचे वर्ग पूर्णतः रिकामे आहेत. शाळा सुरू नाहीत. शाळेमध्ये निर्जंतुकीकरण करून तेथे लसीकरण मोहीम राबविल्यास कोरोना-19 नियमांचे पालन होईल आणि लसीकरण मोहीम संपल्यानंतर पुन्हा शाळा निर्जंतुकीकरण केल्यास कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

रेल्वे स्थानकाच्या कामाचा आढावा

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्यात लसीकरणानंतर तीन मुले दगावली

Amit Kulkarni

शिवानी भोसले यांना आंतरराज्य पुरस्कार जाहीर

Patil_p

बुडा कोणत्या जागेत वसाहत योजना राबविणार?

Amit Kulkarni

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p

डॉ. रायमाने दांपत्यांकडून प्रियंका कांबळे यांचा सन्मान

Patil_p