Tarun Bharat

वडगाव येथे रेशनचा तांदूळ-दूध पावडर जप्त

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

धामणे रोड, वडगाव येथील एका भाडोत्री घरात साठवून ठेवण्यात आलेला 13 क्विंटल 85 किलो रेशनचा तांदूळ व 86 पाकिटे दूध पावडर जप्त करण्यात आली आहेत. अन्न व नागरी पुरवठा खाते आणि शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

यासंबंधी असिफ खुतबुद्दिन किल्लेदार, राहणार बस्ती गल्ली, जुने बेळगाव याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यानेच हा साठा केला होता. भाडोत्री घरावर छापा टाकताच असिफने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहापूरचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार, उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे व्ही. बी. दिवटगी आदींनी ही कारवाई केली आहे.

अन्नभाग्य योजनेंतर्गत वाटण्यात आलेला तांदूळ साठवून ठेवण्यात आला होता. कमी दराने या तांदळाची खरेदी करून जादा दर आकारून विक्री करण्यासाठी त्याने हा साठा केल्याचे उघडकीस आले आहे. याबरोबरच क्षीरभाग्य योजनेंतर्गत लहान मुलांना वाटप करण्यात येणारी दूध पावडरचा साठाही त्याने केला होता. 86 दूध पावडरची पाकिटे जप्त करण्यात आली आहेत. शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

राष्ट्रभक्तीची प्रेरणा जागवणारी दौड

Patil_p

विविध मागण्यांसाठी विणकरांनी दिले निवेदन

Patil_p

धारवाड रोड उड्डाणपुलाखालील रस्त्याची वाताहत

Patil_p

नगर राजभाषा अंमलबजावणी समितीतर्फे हिंदी दिवस-पारितोषिक वितरण

Omkar B

भग्नप्रतिमा जमविण्याचा उपक्रम अव्याहत

Amit Kulkarni

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम

Amit Kulkarni
error: Content is protected !!