Tarun Bharat

वडापाव चालकाची गळफास घेवून आत्महत्या

प्रतिनिधी/ सातारा

समर्थ मंदिर परिसरात स्वामी समर्थ वडापाव सेंटरचे मालक धनंजय विष्णू फडतरे यांनी गळफास लावून घेवून शुक्रवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून ती शाहुपूरी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पोलीस तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की समर्थ मंदिर येथे धनंजय फडतरे यांचे वडापावचे सेंटर आहे. ते नियमित तेथे व्यवसाय करायचे. मात्र, आज सकाळी ते रहात असलेल्या खोलीचा दरवाजा त्यांचा मुलगा शुभम याने उघडला तेव्हा त्यांनी गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले. त्याने नगरसेवक धनंजय जांभळे यांना फोन करुन माहिती दिली. जांभळे यांनी पोलिसांना माहिती दिली. शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी धनंजय फडतरे यांनी जेथे आत्महत्या केली त्या जागेचा पंचनामा केला. त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

Related Stories

मराठा आरक्षण : भाजपाने सत्ता असताना आवश्यक ती पुर्तता केली असती तर आज ही परस्थिती नसती : आ. अरुण लाड

Archana Banage

राणा-कडू वाद मिटणार? दिलगिरी व्यक्त करत रवी राणांकडून ५० खोक्यांचं वक्तव्य मागे

Archana Banage

”मोदी सरकारकडून अर्थव्यवस्थेचे वाटोळे”

Archana Banage

विना मास्क फिरणाऱया 101 दुचाकीस्वारांवर करवाई

Patil_p

वनविभागाच्या भरारी पथकाचा आंबेदरेत छापा

datta jadhav

मातोश्रीवर जाणारच, राणा दाम्पत्याने घरातूनच शेअर केला व्हिडिओ

datta jadhav