Tarun Bharat

वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलीचाही हक्क

Advertisements

उच्च न्यायालयाने बेळगावच्या दांपत्याला दिला दिलासा

प्रतिनिधी/ बेळगाव

वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीलाही समान वाटणी देण्याचे आदेश यापुर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आता तर विवाहित मुलीलाही वडिलांच्या नोकरीवर हक्क सांगण्याचा अधिकार असल्याचा निकाल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे. वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलगी दावा करते तेंव्हा न्यायालयाने तिची बाजु ऐकून घेवून नोकरीत समावून घेण्याचे निर्देंश सरकारला दिले आहेत.

भुवणेश्वरी विनायक पुराणिक (वय 31, रा. तानाजी गल्ली, बेळगाव), तिचे वडील अशोक अडव्याप्पा मडिवाळाप्पा यांचा 2016 साली मृत्यू झाला. अशोक यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी भुवणेश्वरी हिचा विवाह बेळगाव येथील तरुणाबरोबर झाला. तर भुवणेश्वरीचा भाऊ हा खासगी नोकरी करत आहे. अशोक मडिवाळाप्पा हे एपीएमसीमध्ये नोकरीला होते. त्यांचा त्या ठिकाणी अकाली मृत्यू झाल्याने कुटुंबातील एकाला नोकरी मिळू शकते. मात्र भुवणेश्वरीचा भाऊ याने मी तेथे नोकरी करणार नाही म्हटले.

त्यामुळे विवाहित भुवणेश्वरी हिने वडिलांच्या नोकरीमध्ये मला सामावून घ्यावे,  असा अर्ज कृषी विभागाच्या संयुक्त संचालक (प्रशासकीय) विभागाकडे केला. मात्र तुझे लग्न झाले असून आम्ही तुला नोकरी देवू शकत नाही म्हणून तिचा अर्ज फेटाळला. त्या विरोधात तीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी म्हणणे एकूण न्यायाधीश एम. नागप्रसन्ना यांनी मुलींनाही समान संधी असून विवाह झाला तरी तिला वडिलांच्या ठिकाणी नोकरीत सामावून घ्यावे, असा आदेश दिला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा एक वेगळा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे.

या निकालामुळे आता वडिलांच्या मालमत्तेबरोबरच वडिलांच्या नोकरीवरही मुलींचा अधिकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही कारणाने नोकरीवर असताना मृत्यू झाला तर अनुकंपा म्हणून त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी दिली जाते. मात्र आता त्यांच्या मुलांनाच नाही तर विवाहित मुली देखील त्या ठिकाणी रुजू होवू शकतात, हे या निकालावरुन स्पष्ट झाले आहे. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयातही अशा प्रकारचा निकाल लागला होता. त्याचा आधार घेत भुवणेश्वरीचे वकील ऍड. मनमोहन पी. एन. यांनी न्यायालयात तीची बाजू मांडली आणि त्या विवाहित मुलीला न्याय मिळाला.

Related Stories

भाषिक तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर-निपाणी बससेवा बंद

Abhijeet Shinde

नाझर कॅम्प परिसरात सीडीवर्कचे काम अर्धवटच

Amit Kulkarni

जिल्हय़ात शेती पिकांचे 11.70 कोटीचे नुकसान

Patil_p

बॅडगी मिरचीचे भाव गगनाला

Patil_p

मटणाचे दर नियंत्रणात आणण्याची मागणी

Amit Kulkarni

संतिबस्तवाड येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Omkar B
error: Content is protected !!