Tarun Bharat

वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी घेतली उत्तुंग भरारी

अक्षता नाईक / बेळगाव

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहितचे बालपणापासूनचे सैन्यात उच्च अधिकारी बनण्याचे स्वप्न. वडिलांचीही तीच इच्छा. आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी रोहितने उत्तुंग भरारी घेतली असून सध्या त्याला भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.

  निश्चित ध्येय आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मूळचा महागाव. तालुका गडहिंग्लजचा सुपुत्र रोहित अर्जुन शिंदे हा लेफ्टनंट बनला आहे. चेन्नई येथील ऑफिसर टेनिंग संस्थेत प्रशिक्षण घेऊन त्याने या पदाला गवसणी घातली आहे.

  ऑफिसर टेनिंग संस्थेचे एक वर्षाचे खडतर प्रशिक्षणात त्याने पूर्ण केले आहे. दि. 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे झालेल्या ओटीए पासिंग आऊट परेडच्या शानदार समारंभात त्याला दोन स्टार मेरिट ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

  जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याची भारतीय सैन्य दलात आर्मी पायलट म्हणून निवड झाली आहे. तसेच तो आता कारगिलमधील 31 राजपूत युनिटमध्ये दाखल झाला आहे. येथे त्याची दीड वर्ष पोस्टिंग होणार आहे. त्यानंतर तो पायलट टेनिंगसाठी नाशिकच्या आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये रुजू होईल.

  कुटुंबामध्ये सर्वजण शिक्षक, डॉक्टर, इंजिनियरिंग या सारख्या क्षेत्रात आहेत. प्रथमच भारतीय सैन्यात वयाच्या पंचवीसाव्या वर्षात रोहितला लेफ्टनंटपद मिळाले आहे.

 लहानापासूनच रोहितला सैन्य दलात रुजू होण्याची इच्छा होती. त्याचे पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण तुर्केवाडीतील मराठी शाळेत झाले. तर पुढील पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल अंबोली येथून त्याने पूर्ण केले. बारावीनंतर त्याने एनडीएची परीक्षा दिली. मात्र त्यात निवड होता होता राहिली. परंतु खचून न जाता त्याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन त्याने आपल्या व आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी उत्तुंग भरारी घेतली आहे. यात त्याला त्याचे कुटुंबाचे सहकार्यही मोलाचे लाभले. योग्य मार्गदर्शन, जिद्द, चिकाटी आणि अभ्यास याच्या जोरावर तो स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्नशील राहिला. स्वयंजाणिवेतून जागृत झालेले देशप्रेम त्याच्या ध्येयाकडे घेऊन जाण्यास रोखू शकले नाही. तसेच पुढच्या काळात खडतर असे प्रशिक्षण घेऊन अव्वलस्थानी जाण्याचा त्याचा मानस असल्याचे बोलताना रोहित म्हणाला.

 माझ्यासाठी अभिमानास्पदबाब  : आशा अर्जुन शिंदे (गावडे)

 माझ्या मुलाला लेफ्टनंट पद मिळाले ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यासाठी रोहितने अथक परिश्रम घेतले आहेत. माझ्या पतीचे स्वप्न मुलाने पूर्ण केले. त्यामुळे मला त्याचा गर्व आहे. यामध्ये घरच्यांचे त्याला खूप मोठे मोलाचे सहकार्य लाभले असून मोठय़ा बहिणीनेही वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. आता मला सर्वजण लेफ्टनंट रोहित शिंदेची आई म्हणून ओळखणार याचाच मला खूप मोठा आनंद झाला आहे.

माझे स्वप्न मुलाने पूर्ण केले : अर्जुन शिंदे

 मला स्वतःलाच आर्मीमध्ये भरती व्हायचे होते पण ते शक्मय झाले नाही. पण तीच आवड माझ्या मुलांमध्ये होती. वयाच्या 11 व्या वर्षापासूनच त्याचा कल दिसून आल्यामुळे आम्ही आंबोलीच्या सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेतला. व त्या ठिकाणी तो आदर्श विद्यार्थी म्हणून नावारूपाला आला. तसेच तो सध्या चेन्नई येथे झालेल्या प्रशिक्षण शाळेत टॉप टेनमध्ये आल्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान वाटत आहे. तसेच आर्मी पायलट म्हणून निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक होत असल्याने अभिमान वाटत आहे.

Related Stories

जायंट्स मेनने स्मशानभूमीमध्ये साजरी केली दिवाळी

Patil_p

वैद्यकीय कचऱयाची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न गंभीर

Amit Kulkarni

बेळगाव शहर आता ‘ग्रीन’ श्रेणीत

Omkar B

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा

Amit Kulkarni

बागलकोट जिल्हय़ात 234 नवे बाधित

Patil_p

आरपीडी कॉर्नर परिसरात सांडपाण्याचे डबके

Amit Kulkarni