Tarun Bharat

वडूज येथे पाच लाखाची दारू जप्त

Advertisements

प्रतिनिधी/ वडूज

वडूज पोलीसांनी अवैद्य दारू संबंधी दोन कारवाया करून त्यांच्याकडून एकूण 4 लाख 93 हजार 230 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. पोलीसांनी ही कारवाई शनिवारी (ता.5) मध्यरात्री केली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण दत्तात्रय जाधव (रा.वडूज) हा बेकायदेशीरपणे देशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यांनुसार पोलीसांनी सातेवाडी कॉर्नर याठिकाणी खासगी वाहनातून जावून सापळा लावला. त्याठिकाणी बेकायदेशीपणे दारूची वाहतूक करणाया वाहनाचा चालक अजित सुखदेव बुरूंगले (रा. गणेशवाडी,ता.खटाव) याच्या ताब्यातून 63 हजार 360 रूपये किंमतीचे देशी दारूचे 22 बॉक्स, चार लाख रूपये किंमतीचे एक पांढया रंगाचे चारचाकी वाहन असा एकूण 4 लाख 63 हजार 360 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यावेळी बुरूंगले याच्या समवेत असलेला किरण जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन फरारी झाला.

किरण जाधव याच्या राहत्या घराच्या आडोश्याला आणखी दारूचा माल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी जाधव याच्या घराजवळ छापा टाकून त्याठिकाणाहून 14 हजार 400 रूपये किंमतीची देशी दारूचे 5 बॉक्स व 15 हजार 470 रूपयांची रोख रक्कम असा 29 हजार 870 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. दोन्ही घटनेत पोलीसांनी एकूण 4 लाख 93 हजार 230 रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शितल देशमुख, पोलीस हवालदार दादासाहेब शिरकुळे, दिपक देवकर, आण्णा मारेकर, भूषण माने, सागर बदडे, दयाबा नरळे, अनिता जगदाळे सहभागी झाले होते. अधिक तपास राहूल सरतापे, रेखा खाडे करीत आहेत.

Related Stories

”बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले”

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 226 जणांना डिस्चार्ज, 46 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

व्हॉटसअ‍ॅपवर जातीय तेढ निर्माण करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

अभिनेते हेमंत जोशी यांचे निधन

Abhijeet Shinde

सातारा : रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने दिले भावाला जीवदान

Abhijeet Shinde

सातारा : वाई पोलीस उपविभागाच्या उपाधिक्षक डॉ. शीतल जानवे (खराडे) यांनी स्वीकारला पदभार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!