झाडांना गुंडाळले ऍल्युमिनियमचे ब्लँकेट
अमेरिकेच्या जंगलांमध्ये लागलेल्या आगीने कित्येक झाडांना गिळपृंत केले आहे. पण आता कॅलिफोर्नियात असलेल्या जगातील सर्वात मोठय़ा वृक्षांच्या अस्तित्वावर संकट घोंगावू लागले आहे. या वृक्षांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान दिवसरात्र झटत आहेत. प्रयत्नांच्या अंतर्गत या वृक्षांना आता ऍल्युमिनियमचे ब्लँकेट गुंडाळले जात आहे. वणवा आता जायंट फॉरेस्टपर्यंत पोहोचण्याच धोका निर्माण झाला आहे. या जंगलात जगातील सर्वात विशाल वृक्ष आढळून येतात.
सर्वात मोठा वृक्ष धोक्यता
नॅशनल वाइल्डफायर कोऑर्डिनेटिंग ग्रुपनुसार कॅलिफोर्नियाच्या सेकोया नॅशनल पार्कमध्ये 10 सप्टेंबरपासून पॅराडाइज अँड कॉलनी फायर्स धगधगत आहे. वीज कोसळून लागलेली आग पार्कमधील 11,365 एकर क्षेत्रात फैलावली असून आता जायंट फॉरेस्टच्या दिशेने सरकू लागली आहे. या जंगलात जगातील सर्वात मोठा वृक्ष ‘जनरल शेरमन’ आहे.


2200 वर्षे जुना वृक्ष
जनरल शेरमनचे वय 2200 वर्षे आहे. 83 मीटर उंच आणि 11 मीटर रुंदीचा हा वृक्ष एखाद्या आश्चर्यापेक्षा कमी नाही. हा वृक्ष आग झेलू शकतो. पण हवामान बदलामुळे आगीची तीव्रता वाढत चालली आहे. या तीव्रतेकरता हे प्राचीन वृक्ष तयार नाहीत.
वाचविण्याचा प्रयत्न मागील वर्षी कॅसल फायरमध्ये हजारो वृक्ष जळून खाक झाले होते. जनरल शेरमन आणि अन्य विशाल वृक्षांना वाचविण्यासाठी ऍल्युमिनियमचे आच्छादन लावले जात आहे. आग आणि उष्णता रोखण्यासाठी ऍल्युमिनियमचा वापर होतोय. याचबरोबर परिसरातील झुडुप हटविली जात आहेत.