Tarun Bharat

‘वत्सलाहरण’ संयुक्त दशावताराला रसिकांचा प्रतिसाद

Advertisements

सलग 9 तास 9 मिनिटे लाईव्ह प्रसारण

प्रतिनिधी / कुडाळ:

कोकणातील लोककलेचा महाजागर करण्याच्या उद्देशाने कोकण नाऊने कुडाळ येथून यूटय़ूबद्वारे ‘वत्सलाहरण’ या संयुक्त दशावताराच्या नाटय़प्रयोगाचे आयोजन केले होते. सलग 9 तास 9 मिनिटे लाईव्ह कार्यक्रम प्रसारित करून हजारो दर्शकांना आपल्यासोबत कायमस्वरुपासाठी जोडून ठेवण्याचा विक्रम ‘कोकण नाऊ’ने केला. तर दशावताराच्या इतिहासात प्रथमच सुधीर कलिंगण व नितीन आसयेकर या दोन दिग्गज रंगकर्मींना एकाच मंचावर सर्वप्रथम आणण्याचा योगही ‘कोकण नाऊ’ने घडवून आणला. या कार्यक्रमावेळी राजकीय नेतेमंडळींही पक्षीय वस्त्रs दूर ठेवून एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले.

कोकण नाऊच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या यूटय़ूब फेसबूक लाईव्ह उपक्रमाच्या 100 व्या भागाचे औचित्य साधून दशावताराच्या इतिहासात प्रथमच व्हर्च्युअल महादशावतार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीगणेशाचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिवसेना नेते संदेश पारकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, बापू नाईक, कोकण नाऊचे संचालक विकास गावकर, सौ. वैशाली गावकर, स्वरुप सावंत, दीपक भोगटे, लक्ष्मण मांजरेकर, लक्ष्मण पेडणेकर, राजू शिरसाट आदी उपस्थित होते.

कोकणची लोककला म्हणून ओळखल्या जाणाऱया दशावतारातील पहिल्या-वहिल्या व्हर्च्युअल दशावतार कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. लॉकडाऊनमुळे साडेतीन ते चार महिने बंद असलेल्या दशावतारी कलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत व्हर्च्युअल प्रकारात ‘कोकण नाऊ’ने एक संधी दिली आहे. या माध्यमातून हजारो दर्शक कोकण नाऊच्या माध्यमातून व्हर्च्युअल दशावतारी नाटय़प्रयोग पाहू शकले. त्यामुळे दशावतारी नाटय़चळवळ सावरण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास आमदार नाईक यांनी व्यक्त केला.

यावेळी विकास गावकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विष्णू नाईक, दिनेश मांजरेकर, नितीन आसयेकर, प्रशांत मेस्त्राr, भास्कर वैद्य, दादा राणे-कोनस्कर, विलास गवस, राजन गावडे, दिनेश गोरे, पुरुषोत्तम खेडेकर, सुधीर कलिंगण, बंटी कांबळी, राजू हरयाण, कृष्णा घाटकर, ओमप्रकाश चव्हाण, मयुर गवळी, किसन नेमळेकर, विनायक सावंत या दिग्गज दशावतारी कलाकारांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन बादल चौधरी व ओंकार गावकर यांनी केले. विकास गावकर यांनी आभार मानले.

Related Stories

चिखली ग्रामपंचायतीने दिला गरजुंना आधार

Patil_p

कोल्हापूरच्या ‘क्वारंटाईन’ युवकाची गळफासाने आत्महत्या

NIKHIL_N

काँग्रेस तालुका अध्यक्ष आबा मुंज यांचे निधन

NIKHIL_N

नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपद मिळताच वेंगुर्ले भाजपतर्फे जल्लोष

Anuja Kudatarkar

प्रवासी वाहतुकीचा परवाना अखेर प्राप्त

NIKHIL_N

मंजूर कामांची निविदा प्रक्रिया त्वरित करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!