Tarun Bharat

वनक्षेत्रपाल यांनी केली शिवकालीन राजमार्गाची पाहणी

प्रतिनिधी/ महाबळेश्वर

भेकवली ते धारदेव या चार किमी शिवकालिन राजमार्गाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी महाबळेश्वर वन विभागाने पाउले उचलली आहेत. या राजमार्गा वरील काटेरी झुडपे काढुन तो संपूर्ण शिवकालिन राजमार्ग हा मोकळा आणि स्वच्छ करण्यात आला आहे हे काम पूर्ण झाल्या नंतर त्या मार्गाची पाहणी महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी केली . 

ब्रिटीशांनी महाबळेश्वर वसविण्यापूर्वी किल्ले प्रतापगड ते अजिक्यतारा हा शिवकालीन राजमार्ग अस्तित्वात होता. राजमार्ग हा रडतुंडीच्या घाटातुन वर येवुन महाबळेश्वर मार्गे पुढे जात होता किल्ले प्रतापगडा वरून सुरू झालेला राजमार्ग हा पारपार , मेटतळे , जन्नीमाता मंदीर , मुंबई पॉईंट , चायनामन वॉटर फॉल , बॉबिग्टन पॉईंट , ब्लु व्हेली चौकी , गोटेनिरा जाधव मळा , शिंदोळा , प्लुटो पॉईंट , भालगी , टेकवली , रेंगडीमुरा , बगदाद पॉईंट , धारदेव , कास पठार , यवतेश्वर व पुढे किल्ला अजिंक्यतारा असा हा साधारण 80 कि मी अंतराचा शिवकालिन राजमार्ग आहे. या 80 किमी पैकी टेकवली ते धारदेव हा चार किमी रस्ता हा घनदाट जंगलातुन जातो सध्या वन विभागाच्या वतीने रानवाटा , राईड यांचे संवर्धन व संरक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे चार किमी रस्त्यावर वाढलेली झाडे झुडपे गवत हे काढुन हा राजमार्ग संपूर्ण स्वच्छ करण्यात आला आहे या साठी गेली चार दिवस दहा मजुर या ठिकाणी काम करीत होते हे काम पूर्ण झाल्या नंतर आता या राज मार्गाची पाहणी वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकारां समवेत केली या वेळी वनपाल सहदेव भिसे , वनरक्षक रमेश गडदे , पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिजीत खुरासणे विलास काळे व सचिन शिर्के आदी उपस्थित हेते जंगलातील राईड , रानवाटा या ठिकाणी साफसफाई अभावी गवत व झुडपे वाढली होती ती साफ करून जंगलातील रस्ते तयार करण्यात येत आहे पूर्वी अशा राईडवर घोडयावरून पयर्टक हे जंगल सफारीचा आनंद घेत होते अशाच प्रकारे आता जंगलातील राईड व रानवाटा पयर्टकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे सध्या तयार केलेला शिवकालिन राजमार्ग पयर्टकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे या राजमागार्वरून पयर्टक पायी जंगल सफारीचा आनंद लुटू शकतात अशी माहीती वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी पत्रकारांना दिली.

Related Stories

लक्ष्मी टेकडी परिसरातही डेंग्यू, चिकुन गुनियाच?

Patil_p

अलगीकरण कक्षापर्यंत पोहोचले राजकारण

Archana Banage

महाराष्ट्रात 5,123 रुग्णांना डिस्चार्ज; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64%

Tousif Mujawar

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

Tousif Mujawar

प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत फेरीवाल्यांना कर्ज

Archana Banage

ठाकरेंचीच शिवसेना जिंकली, दसरा मेळावा शिवतीर्थावरच; उच्च न्यायालयाची परवनगी

Archana Banage