Tarun Bharat

वनखात्याने लावलेल्या रोपांना आगीची झळ

नागरिकांच्या निष्काळजीपणाचा वनखात्याला फटका

प्रतिनिधी / बेळगाव

उष्णतेत वाढ झाली असून पारा वाढत आहे. त्यामुळे आग व वणवे लागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वनखात्याने यंदाच्या हंगामात ग्रामीण भागातील विविध मार्गावर 18 हजारांहून अधिक रोपांची लागवड केली आहे. मात्र, काही मार्गावर आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वनखात्याला फटका बसत आहे.

वनखाते दरवषी लाखो रोपांची लागवड करते. याकरिता लाखो रुपये खर्च करते. मात्र, काही लोकांच्या निष्काळजीपणाचा फटका वनखात्याला बसत आहे. वनखात्याने जून महिन्याच्या दरम्यान तालुक्मयातील हिंडलगा, काकती, बेळगुंदी, चलवेनहट्टी, बेकिनकेरे, हंदिगनूर आदी भागातील संपर्क रस्त्यांवर रोपांची लागवड केली आहे. मात्र काही शेतकरी आपल्या शेतातील झाडेझुडुपे जाळण्यासाठी आगी लावत आहेत. मात्र, यात रस्त्याशेजारी असलेल्या व वनखात्याने लावलेल्या रोपांना आगीची झळ बसून ती नष्ट होत आहेत.

Related Stories

केएलएस-संत मीरा यांच्यात आज अंतिम लढत

Amit Kulkarni

थांबलेल्या वाहनांतून डिझेल चोरणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

वडगाव येथे विणकराची आत्महत्या

Tousif Mujawar

मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे 9 जानेवारीला भव्य कुस्ती मैदान

Amit Kulkarni

अकरावी पुनर्परीक्षेचा निर्णय 17 मे नंतर

Patil_p

तारिहाळ येथे 12 लाखाची घरफोडी

Patil_p