Tarun Bharat

वनटाईम सेटलमेंटबाबत मनपा उदासीन

Advertisements

थकीत घरपट्टी वसुलीसाठी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केली होती सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने थकलेला मालमत्ता कर वसूल करण्यात यावा याकरिता वनटाईम सेटलमेंटचा प्रस्ताव राबवून नागरिकांना सवलत द्यावी, अशी सूचना माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारी बैठकीत मांडली होती. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करून मंजूर करण्यात आला, मात्र वनटाईम सेटलमेंटचा मुद्दा बाजूला पडला आहे. त्यामुळे कर सवलतीचा लाभ थकबाकीदारांना मिळणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ आणि समाजसेवकांची मते जाणून घेण्यात आली होती. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीवेळी थकीत घरपट्टी वसुलीचा मुद्दा चर्चेत आला होता. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी थकलेली घरपट्टी वसूल करणे गरजेचे आहे. घरपट्टीची रक्कम आणि दंडाची रक्कम वाढत चालल्याने मालमत्ताधारकांना ही रक्कम भरणे अडचणीची जात आहे. त्यामुळे दंडाच्या रकमेत सवलत देऊन वनटाईम सेटलमेंट उपक्रम राबविण्यात यावा, अशी सूचना माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी मांडली होती.

अन्य राज्यांमध्ये असा प्रस्ताव राबवून थकीत घरपट्टी वसूल करण्यात येत आहे. शासनाला याबाबतचा प्रस्ताव पाठवून महापालिकेने वनटाईम सेटलमेंट उपक्रम राबविल्यास मालमत्ताधारकांना फायदेशीर ठरेल. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून थकीत कर वसूल होईल. ठराविक कालावधीसाठी हा उपक्रम राबविल्यास एकाचवेळी ही रक्कम महापालिकेला मिळू शकेल. तसेच थकीत कर वसूल झाल्यानंतर पुढील घरपट्टी नागरिक वेळेवर भरतील. त्यामुळे महापालिकेचे कर वसुलीचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण होईल. या प्रस्तावाचा विचार करून अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली होती. पण या प्रस्तावाचा विचार करण्यात आला नाही. महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करून नुकताच मंजूर करण्यात आला आहे. मात्र वनटाईम सेटलमेंटच्या प्रस्तावाचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात आला नाही.

Related Stories

मालमत्तेच्या उताऱयावर आता घर व घरमालकाचे छायाचित्र

Patil_p

सुदृढ आरोग्यासाठी त्यांची भारतभ्रमंती

Amit Kulkarni

बेळगावला सलग तिसऱया दिवशीही दिलासा

Patil_p

रेमडेसिवीर इंजेक्शन गैरव्यवहारप्रकरणी विजापुरात 9 जणांना अटक : दोघी फरारी

Amit Kulkarni

संकेश्वर शंकराचार्य रथोत्सवास प्रारंभ

Patil_p

बेळगावकरांचा जीवाशी खेळण्याचा प्रयत्न सुरूच

Amit Kulkarni
error: Content is protected !!