Tarun Bharat

वनडेतील कोहली, रोहितची स्थाने कायम

Advertisements

वृत्तसंस्था / दुबई

भारतीय कर्णधार विराट कोहली व सलामीवीर रोहित शर्मा यांनी आयसीसी वनडे मानांकनातील आपले वर्चस्व कायम राखले असून या दोघांनी पहिली दोन स्थाने कायम राखली आहेत. गोलंदाजांच्या मानांकनात जसप्रित बुमराह दुसऱया स्थानावर स्थिर आहे.

कोव्हिड 19 महामारीमुळे अनेक मालिका, स्पर्धा रद्द झाल्याने कोहली (871) व रोहित शर्मा (855) यांनी एकही वनडे सामना खेळलेला नाही. तरीही फलंदाजांच्या क्रमवारीत ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत. पाकच्या बाबर आझमने झिम्बाव्वेविरुद्धच्या मालिकेत 221 धावा जमवित तो या भारतीय जोडगोळीच्या जवळ पोहोचला आहे. त्याने या मालिकेत 8 मानांकन गुण मिळविले. पण तो तिसऱया स्थानावरच आहे. पाकचा अष्टपैलू इमाद वासिमने तीन स्थानांची प्रगती करीत 49 वे स्थान मिळविले आहे. झिम्बाब्वेच्या ब्रेन्डान टेलर (204 धावा) व सीन विल्यम्स (197 धावा) यांनी या मालिकेत शतके झळकावत क्रमवारीत बढती मिळविली आहे. टेलरने 9 स्थानांची प्रगती करीत 42 वे तर विल्यम्सने 12 स्थानांची प्रगती करीत 46 स्थानावर मजल मारली आहे.

गोलंदाजीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (722 गुण) पहिले स्थान कायम राखले आहे तर बुमराह (719) दुसऱया स्थानावर आहे. पाकच्या शाहीन आफ्रिदीने या मालिकेत चांगली कामगिरी केली असून त्याने पहिल्यांदाच टॉप 20 मध्ये स्थान मिळविले आहे. तो आता 16 व्या क्रमांकावर आहे तर वहाब रियाझने सहा स्थानांची प्रगती करीत 60 वे स्थान घेतले आहे. झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने 66 व्या स्थानावर तर डोनाल्ड तिरिपानोने 90 व्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकविरुद्ध शेवटच्या वनडेत सुपरओव्हरमध्ये झिम्बाब्वेने विजय मिळविल्यामुळे त्यांना 10 गुण तर पाकला मालिकेत 20 गुण मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचेही पाकइतकेच गुण झाले आहेत. पण सरस धावगतीमुळे पाकला त्यांच्या पुढचे स्थान मिळाले आहे. इंग्लंडने 30 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे.

Related Stories

महिला विश्वचषक स्पर्धेत आज इंग्लंड-पाक लढत

Patil_p

पाकिस्तान-बांगलादेश पहिली कसोटी आजपासून

Amit Kulkarni

कसोटी मालिका विजयासाठी सर्वोत्तम कामगिरीची गरज

Omkar B

तुर्कीचा गॅझझ पुरुष एकेरीत विजेता

Patil_p

सध्या न खेळणेच योग्य : यूएसटीए

Patil_p

सिंधू, प्रणित, सिक्की यांच्या सरावाला प्रारंभ

Patil_p
error: Content is protected !!