Tarun Bharat

वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी

मँचेस्टर :

मिचेल मार्श आणि मॅक्सवेल यांची शतकी भागीदारी तसेच फिरकी गोलंदाज झंपाच्या चार बळींच्या कामगिरीच्या जोरावर शुक्रवारी ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने यजमान आणि विश्वविजेत्या इंग्लंडचा 19 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली.

सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱयावर असून यापूर्वी यजमान इंग्लंडने टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. त्यानंतर वनडे मालिकेत पहिल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी दिली. ऑस्ट्रेलियाची एकवेळ स्थिती 5 बाद 123 अशी केविलवाणी होती. पण, त्यानंतर मिचेल मार्श आणि मॅक्सवेल यांनी शतकी भागीदारी नोंदविली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 9 बाद 294 धावा जमविल्या.

डेव्हिड वॉर्नर, फिंच स्वस्तात बाद झाल्यानंतर स्टोईनिसने आक्रमक 43 धावा जमविल्या. वूडने त्याला झेलबाद केले. ग्लेन मॅक्सवेलने 59 चेंडूत 4 षटकारांसह 77 तर मार्शने 73 धावा झोडपल्या.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडतर्फे सॅम बिलींग्जने वनडेतील पहिले शतक झळकविले पण झंपाच्या अचूक गोलंदाजीसमोर गडगडल्यानंतर त्यांना विजयासाठी 19 धावा कमी
पडल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथ गुरूवारी नेटमध्ये सराव करताना जमखी झाल्याने खेळू शकला नाही. आज दोन्ही संघात भारतीय प्रमाणवेळेनुसार 5.30 वाजता दुसरा सामना होईल.  

Related Stories

कार्टरचे एक षटकात सहा षटकार

Patil_p

सिलिकला पहिल्या फेरीत पुढे चाल

Patil_p

जर्मनीचा व्हेरेव्ह अंतिम फेरीत

Patil_p

बेडोसा, हॅलेप, स्वायटेक उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

आजाराला कंटाळून कोल्हापूरच्या कबड्डी पट्टू युवतीची आत्महत्या

Abhijeet Khandekar

तिकिटासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत 4 जण जखमी

Amit Kulkarni