Tarun Bharat

वनडे मालिकेसाठी डु प्लेसिसला विश्रांती

Advertisements

वृत्तसंस्था / केपटाऊन

सध्या इंग्लंडचा क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर असून आगामी होणाऱया तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघातील अनुभवी फलंदाज डु प्लेसिसला विश्रांती देण्यात आली आहे.

या दौऱयामध्ये इंग्लंडने तीन सामन्यांची टी-20 मालिका नुकतीच एकतर्फी जिंकली आहे. आता वनडे मालिका काबीज करण्यासाठी इंग्लंडचा संघ सज्ज झाला आहे. या वनडे मालिकेसाठी माजी कर्णधार डु प्लेसिस तसेच रबाडा, व्हान बिलजॉन, फॉर्च्युइन आणि रेझा हेंड्रिक्स यांनाही विश्रांती देण्याचा निर्णय क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या निवड समितीने घेतला आहे. रबाडाची दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच स्थानिक राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेतील चार दिवसांच्या सामन्यात आता बिलजॉन, फॉर्च्युइन आणि हेंड्रिक्स यांचे पुनरागमन होत आहे. इंग्लंडविरूद्ध झालेल्या टी-20 मालिकेत डु प्लेसिसने तीन सामन्यांत 121 धावा जमविल्या होत्या. उभय संघातील पहिला वनडे सामना शुक्रवारी खेळविला जाणार आहे.

Related Stories

भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

आशिया चषक टी-20 स्पर्धा जून 2021 मध्ये घेण्याचा विचार

Patil_p

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

prashant_c

इंग्लंड दौऱयावर जाण्यास तीन विंडीज खेळाडूंचा नकार

Patil_p

जलतरणपटू श्रीहरी नटराजचे दुसरे सुवर्णपदक

Patil_p

एमसी मेरी कोमच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

Patil_p
error: Content is protected !!