Tarun Bharat

वनराज कुमकर यांनी घरातून केले नवं उधोजकाना मार्गदर्शन

Advertisements

प्रतिनिधी / सातारा

सातारा शहरातले एकपात्री प्रयोगकार, विनोद वीर अशी ओळख असलेले वनराज कुमकर हे व्यक्तिमत्त्व. त्यांनी वाजवा गाजराची पुंगी या नावाने आता पर्यंत साडे पाच हजार प्रयोग केले आहे. लॉक डाऊनच्या काळात त्यांनी सातारा शहरासह जिल्हयातील नवं उधोजकाना फेसबुकवरन लाईव्ह येऊन मार्गदर्शन केले. त्यांनी दिलेली उदाहरणे, सोपी आणि सुटसुटीत भाषा पाहून साताराकर नागरिकांना आपलेसे केले. आम्ही एकपात्री महाराष्ट्र संघाच्यावतीने ते एकपात्री प्रयोग सादर करत असतात.

लॉक डाऊनमध्ये वनराज कुमकर यांनी वाजवा गाजराची पुंगी हा कार्यक्रम फेसबुकवर सादर केला.त्यांनी घरबसल्या कोणते उधोग करता येतील याची थोडीशी माहिती दिली. ते म्हणाले, मी काय फार मोठा तज्ञ आहे असं काही नाही. परंतु गेली वीस पंचवीस वर्षे या फिल्डमध्ये मी काम करतो आहे. तसं बघायला गेलं तर खूप संस्थेमध्ये मी काम करतो. स्वदेश फाऊंडेशन, माणदेशी फाऊंडेशन, मिटकॉन, जिल्हा उधोग केंद्र अशा अनेक संस्था आहेत. तेथे मी जाऊन त्यांना व्यवसायाचे मार्गदर्शन करत असतो. मंडळी आता आपण सगळे लॉक डाऊन मध्ये आहोत म्हणजे सगळे घरात अडकलेले आहोत. चांगली गोष्ट आहे. आपल्याला कोरोनावर मात करायची असेल तर जोपर्यंत लॉक डाऊन आहे. तोपर्यंत घरातच राहू या. आमच्या या उपक्रमाचा लाभ घेऊ या. या कार्यक्रमातुन अनेक उधोजक घडले. मी काय काय करतो वेळ येईल तसे आपल्याशी बोलत जाईन.

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली.अशी आपल्याकडे म्हण आहे. पण थांबा पुंगी मोडायची नाही मी सांगतो ना कशी वाजवायची ती. आज घराघरात आपण बघतोय अनेक सुशिक्षित पडून आहेत, नोकऱ्या नाहीत. उधोग नाहीत. उधोग करायचं म्हटलं तर भांडवल नाही. भांडवलासाठी कुठं फिरावं म्हणलं तर बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. कारण तारण लागत. अशा परिस्थितीमध्ये आपण सुशिक्षित बेरोजगारानी किंवा ज्यांना रोजगार करायचा त्यांनी काय करावं नेमकं हेच कळत नाही. छोटे छोटे उधोग कसे करायचे हे जाणून घेतले पाहिजे. उधोग करायचं म्हणलं तर स्वतः मध्ये उधोजकता लागते. असावी लागते नसेल तर आणावी लागते, असे मार्गदर्शन केले.

Related Stories

कराड लॉकडाऊनला संमिश्र प्रतिसाद

Patil_p

‘या’ मागणीसाठी रामदास आठवले यांनी अमित शहा यांना पाठवले पत्र

Rohan_P

जिह्यातील 450 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक जाहीर

Patil_p

कोयना परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के

Abhijeet Shinde

मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार; ग्रंथालयेही सुरू

Rohan_P

जिह्यात धार्मिक स्थळावरील भोंगे वाजलेच नाहीत

Patil_p
error: Content is protected !!