Tarun Bharat

वनविभागाच्या भरारी पथकाचा आंबेदरेत छापा

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील आंबेदरेत विना परवाना लाकडाची वाहतूक होणार असल्याची माहिती वनविभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. त्यांनी छापा टाकून तीन वाहने व लाकुड असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला. दोन जणांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे यांना मिळालेल्या माहितीवरुन आंबेदरे येथे वनविभागाच्या भरारी पथकाने सापळा लावला.  त्यावेळी लाकडाची विनापरवाना वाहतूक करणारे दोघे जण जाळय़ात सापडले. ट्रक्टर क्रमांक एमएच11जी4543 ट्रॉली क्र. एएच11आर670 तर पिकअप एमएच11टी2564 यास लाकूड असा सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. प्रल्हाद वसंतराव शेडगे रा. शाहुपूरी, बाजीराव प्रकाश लोंढें रा. आकाशवाणी झोपडपट्टी या दोघांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथकाचे सचिन डोंबाळे, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, वनपाल दीपक गायकवाड, पो. कॉ. राजेश वीरकर, सुहास पवार, वनरक्षक विजय भोसले, डोंगा ओंकार ढाले यांनी केली.

Related Stories

शिक्षणविरोधी धोरणामुळे ठाकरे सरकारने पुरस्कार रोखले

datta jadhav

जाचहाट प्रकरणी पोलीस अधिकायाविरुद्ध गुन्हा

Patil_p

रिक्त पदांमुळे शिक्षण व्यवस्था सलाईनवर

Archana Banage

मंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची बाधा

Tousif Mujawar

तृतीय पंथीयाचा पोलीस भरतीसाठी साताऱयात सराव सुरु

Patil_p

…तर माफीचे साक्षीदार बनून सगळं उघड करू

datta jadhav
error: Content is protected !!