Tarun Bharat

वनसमितीच्या पैशावर कासाणीतील टग्यांचा डोळा

वार्ताहर/ कास

कोरोनोच्या महामारीत देश एक माहिन्यापासुन लॉकडाऊन झाला असून एकमेकांना मदतीचा हात पुढे करण्याची आवशक्यता असताना कासाणी गावातील गावटगे राजकारण करत आहेत. कास पठार वनसमितीच्या मदतीच्या निधीतून सर्वांना मदत मिळवुन देण्याऐवजी बारा कुटुंबांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले असून जिल्हाधिकारी व संबधित वनअधिकाऱयांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

  जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार या पठारच्या नियोजनासाठी असणाऱया सहा गावांच्या कास पठार कार्यकारी वनसमितीला पर्यटकांच्या माध्यमातून दरवर्षी कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न होते. वार्षिक खर्च वजा करून उर्वरित रकमेतून पठार परिसराचा विकास व सामाजिक उपक्रम दरवर्षी वनसमितीच्या माध्यमातून राबविले जातात. 

कोरोना रोगाचा प्रर्दुभाव वाढु लागल्याने देश लॉकडाऊन झाला त्यामुळे गरजुंना  अन्न धान्याची टंचाई भासु लागल्याने कास वनसमीतीने कार्यक्षेत्रातील सहा गावांमध्ये सरसकट अन्नधान्य वाटप करण्याचा निर्णय  घेतला त्यानुसार इतर गावांमध्ये वाटपही झाले मात्र कासाणी गावातील गाव टग्यांनी जाणिव पुर्वक राजकारण करत कासाणी गावातील काही लोकांना वाटप केले असुन कासाणी गावात मोडत असणाया कासाणी मुयावर राहणाया हातावर पोट असणाया धनगर समाजाच्या  गरजु बारा कुंटुबांना  मदती विना जाणीव पुर्वक वंचित ठेवल्याने कास वन समीतिच्या कारभाराची  व कासाणीतील सदस्य गाव टग्यांची चौकशी करून न्याय देण्याची मागणी  कासाणी मुयावरील बारा कुंटुंबानी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे

Related Stories

धक्कादायक! पुण्यात अवघ्या 13 महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

datta jadhav

कोल्हापूर : नागपूर – रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध

Archana Banage

Who is Dhangekar? देशाचे नेते फिरवले गल्लीभर,धास्तीने जागेच रात्रभर…

Archana Banage

किमान विक्री दर वाढीसह हवे द्विस्तरीय साखर धोरण; साखर उद्योगाची मागणी

Abhijeet Khandekar

अजिंक्यतारा कारखान्याच्या गळीत हंगामाचा बुधवारी शुभारंभ

Patil_p

…हा तर राज्यातील जनतेचा अपमान

datta jadhav