Tarun Bharat

वनौषधी विद्यापीठाचे पुरस्कार जाहीर

Advertisements

-रविवारी होणाऱया आयुर्वेद राष्ट्रीय परिषदेत पुरस्काराने मान्यवरांचा सन्मान

-डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान

प्रतिनिधी/कोल्हापूर

वनौषधी विद्यापीठ संस्थेच्या तीसाव्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि. 17) राष्ट्रीय आयुर्वेद परिषद होणार आहे. या परिषदेत जीवनगौरव पुरस्कारासह  अन्य पुरस्कार वितरण पालकमंत्री सतेज पाटील, काझिरंगा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. विलास साळोखे यांच्या हस्ते होणार आहे. हॉटेल सयाजी येथील वसंत कॉन्फरन्स हॉलमध्ये सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वनौषधी विद्यापीठाच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील (व्यावसायिक शिक्षण क्षेत्रातील विशेष कार्य), आष्टा आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक वाली, प्रा. विनायक तायडे (मुंबई), नाडी वैद्य आचार्य वैद्यराज संजयकुमार छाजेड (औरंगाबाद), वैद्यराज प्रशांत यवतकर (अहमदनगर), डॉ. संदीप देवल (आंतरराष्ट्रीय संशोधन) यांचा जीवनगौरव पुरस्काराने गौरव केला जाईल. वैद्य रविंद्र मुस (केरळ), वैद्य पद्मावती कुलकर्णी (कर्नाटक), डॉ. नूतन पाखरे (मुंबई), डॉ. सुहास हेर्लेकर, डॉ. प्रियवंदा हेर्लेकर (पुणे), डॉ. शिवकांत पाटील (सांगली), डॉ. धनंजय खेरे (कराड), डॉ. शार्दुली तेरवाडकर (दक्षिण आफ्रिका), सीमा नागासावा (जपान), डॉ. सचिन झाडबुके, मानसोपचार तज्ञ संजय सातपुते (इचलकरंजी), डॉ. उमेश केळकर (शिरोळ), डॉ. सलीम मुल्ला (इस्लामपूर) यांना आयुर्वेद एक्सलन्स गोल्ड मेडल ऍवार्डने सन्मानीत केले जाणार आहेत. यावेळी निमंत्रक डॉ.ऋषीकेश जाधव, उपाध्यक्ष डॉ. प्रणव पाटील उपस्थित होते.

Related Stories

तावडे हॉटेल फाट्यावर वाहतुकीची शिस्त लावा

Archana Banage

वाहून गेलेल्या ‘त्या ‘ युवकाचा मृतदेह् सापडला

Archana Banage

सातारा : कंरजेत भाजी विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

Archana Banage

पाचगावला सोमवारपासून नियमित पाणीपुरवठा

Archana Banage

गंगापूर येथे विवाहितेची आत्महत्या

Archana Banage

प्रयाग चिखली, आंबेवाडी येथील ग्रामस्थांचे स्थलांतर सुरूच

Archana Banage
error: Content is protected !!