Tarun Bharat

वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठीच्या ठरावाबाबत चराठा येथे मार्गदर्शन

ओटवणे / प्रतिनिधी

-सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त कृषी तांत्रिक अधिकारी कर्मचारी संघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा सरपंच सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता चराठा ग्रामपंचायत सभागृहात मार्गदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. वन्य प्राणी व पशुपक्षामुळे होणाऱ्या शेती बागायती योग्य नुकसान भरपाई मिळण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय होण्यासाठी येत्या १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत घ्यावयाच्या ठरावाबाबत या चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  अशा चर्चा सत्राद्वारे जिल्हा सरपंच सेवा संघाने यापूर्वी जिल्ह्यातील सीआरझेड तसेच इको सेन्सिटिव्ह झोनबाबत शासन दरबारी आवाज उठवून त्यात यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे वन्यजीव संरक्षण अधिनियमातील तरतुदीप्रमाणे शासन स्तरावर आवश्यक ते बदल होण्यासाठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ठराव पारित करून हा ठराव शिफारशीसह ऊचित कार्यवाहीसाठी विहित मार्गाने शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे. यासाठीच या  ग्रामसभेच्या ठरावासाठी चर्चासत्र व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Stories

रत्नागिरी : सुप्रसिद्ध फोटोग्राफर संजीव साळवी यांचे कोरोनामुळे निधन

Archana Banage

रत्नागिरी : 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अडीच वर्षांची साधी कैद

Archana Banage

अंगणात उभी केलेली दुचाकी जळून भस्मसात

Patil_p

माजी सैनिक विठ्ठल राऊळ यांचे निधन

NIKHIL_N

‘थ्री एम’च्या व्यवस्थापकासह बसचालक, ठेकेदारावर गुन्हा!

Patil_p

युवराज लखमराजे भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Rohit Salunke