Tarun Bharat

वन टच फौंडेशनच्यावतीने गरजूंना साहित्य वितरण

वार्ताहर /सांबरा

सांबरा येथे सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱया जुना गुड्सशेड रोड बेळगाव येथील वन टच फौंडेशनच्यावतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक साहित्याचे  वाटप करण्यात आले. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाला आपणही काहीतरी देणे लागतो या भावनेतून सांबरा येथे शिवाजी जोगाणी यांच्या पुढाकारातून गरीब व गरजू अशा 25 कुटुंबांचा शोध घेऊन तेथे आहारधान्य साहित्याचे वाटप येथील हनुमान मंदिरात करण्यात आले.

त्यामुळे फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल फोंडू पाटील यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. पाटील यांनी आपल्या कार्याचा आढावा घेताना अनेक दानशूर व्यक्तींकडून आमच्या फौंडेशनला मदत मिळत आहे. या मदतीतून जंगलातून मार्ग काढत दुर्गम भागातील गरीब लोकांपर्यंत कशी मदत पोचवली, याचा आढावा सांगून गरीब लोकांपर्यंत साहित्य पोहोचवून त्यांची सेवा करायचे भाग्य आम्हाला मिळतेय आम्ही खूप भाग्यवान आहोत, असे उद्गार काढले.

या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ईराप्पा जोई, ता. पं. सदस्य काशिनाथ धर्मोजी, ग्रा. पं. सदस्य भुजंग जोई, संतोष देसाई, भुजंग गिरमल, प्रशांत गिरमल, एस. डी. एम. सी.अध्यक्ष भरमा चिंगळी, पिंटू जोई, कल्लापा सोनजी, मोहन जोई, वन टच फौंडेशनचे उपाध्यक्ष संतोष गंधवाले, सदस्य ज्योतेश हुरुडे, संतोष पाटील, संतोष डोण्याण्णावर, सुप्रिता शेट्टी, प्रणिता गुरव, अनिता गुरव उपस्थित होते. भरमा चिंगळी यानी फौंडेशनला 1001 रु. देणगी दिली. सूत्रसंचालन शिवाजी जोगाणी यांनी केले.

Related Stories

नाहक फिरणाऱयांची आता दंडऐवजी कोरोना टेस्ट ?

Amit Kulkarni

दक्षिण भागासाठी दहा खाटांचे रुग्णालय

Patil_p

कर्नाटकात गुरुवारी कोरोनाने गाठला उचांक

Archana Banage

युवा समितीतर्फे अनगोळ शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

Amit Kulkarni

कुडचीत आशा कार्यकर्त्यांवर हल्ला

Patil_p

एप्रिल ते जुलै या कालावधीत ३८ हजार प्रवाशांनी बेंगळूर विमानतळावरुन केला प्रवास

Archana Banage