Tarun Bharat

वरवली-धुपेवाडी बनतेय कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’

आणखी दोघांना कोरोना, बाधितांची संख्या 43  : किंजळेतही दोघे पॉझिटिव्ह, आरोग्य यंत्रणा मेटाकुटीस

प्रतिनिधी / खेड

तालुक्यातील वरवली-धुपेवाडीत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच  आहे. बुधवारी प्राप्त अहवालानुसार आणखी दोन रुग्णांची वाढ होऊन कोरोनाबाधितांची संख्या 43 वर पोहचल्याने हे गाव कोरोनाचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालले आहे. किंजळेतही दोघांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंत तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 534 झाली आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य यंत्रणा मेटाकुटीस आली असून ग्रामस्थांचीही धास्ती वाढली आहे.

 वरवली गावची लोकसंख्या 778 असून धुपेवाडी, ठाणकेश्वरवाडी, सुतारवाडी, देऊळवाडी, गावठणवाडी, धनगरवाडी आदी 6 वाडय़ांची सुमारे 269 घरे आहेत. एका रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर भजनाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेल्या त्याच्या संपर्कातील 56 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. सर्वप्रथम यातील 27 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच आरोग्य यंत्रणा गतीमान  झशली होती.

 गावातील चार वाडय़ांमध्ये कंन्टेनमेंट जाहीर करून तीन आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली होती. या दरम्यान, आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. बुधवारी आणखी 10 जणांना कोरोना झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली. ही संख्या 41 वर पोहचली असतानाच आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून वरवली-धुपेवाडीतील कोरोनाबाधितांची संख्या 43 वर पोहचल्याने ही वाडी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे.

 आंबवली न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकणाऱया एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 5 दिवस विद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. बुधवारी या शाळेतील45 विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांच्या अहवालाकडे साऱयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने 4 वाडय़ा कंन्टेनमेंट झोन करण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणाही तेथेच तळ ठोकून असून सर्वेक्षण मोहीम अधिक गतिमान केली आहे. वरवली-धुपेवाडीपाठोपाठ किंजळेतही दोघांना कोरोना झाल्याने हे गावदेखील कन्टेनमेंट झोन करण्याच्या हालचाली सुरू होत्या. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. आतापर्यंत माणी, वावे, वरवली, किंजळे या 4 गावांमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. या चारही गावांमध्ये आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. फेब्रुवारी महिन्यातील 18 दिवसात तब्बल 44 कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 534 वर पोहचली असून 57 रूग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 1हजार 402 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून 75 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Related Stories

मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का?

Patil_p

रत्नागिरी : आरवली येथील अपघातात दुचाकी चालक ठार

Archana Banage

दापोलीतील पंचायत समिती आरक्षण सोडत रद्द

Archana Banage

राजापूरचा निवासी नायब तहसीलदार लाच घेताना रंगेहाथ सापडला

Patil_p

दापोलीत तीन वृद्ध महिलांचा जळून मृत्यू

Patil_p

लांजात ट्रक-दुचाकी अपघातात तरूण जागीच ठार

Patil_p