Tarun Bharat

वरिष्ठ अधिकाऱयाकडूनच जिल्हाबंदीचे उल्लंघन

पुण्यातून कुटुंब आणले रत्नागिरीत जिल्हाबंदीचा केला ‘विनोद’

प्रतिनिधीरत्नागिरी

रत्नागिरीमधील एका बडय़ा अधिकाऱयाने आपले कुटुंब रेड झोन असलेल्या पुण्यातून रत्नागिरी आणल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आल़ा  दरम्यान हा अधिकारी राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी या प्रकाराला आक्षेप घेत प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱयासह त्याच्या कुटुंबाला शहराजवळच्या खासगी विश्रामगृहात विलगीकरण करण्यात आले आह़े

जिह्यामध्ये एका मोठय़ा पदावर असलेल्या या अधिकाऱयाचे कुटुंब पुणे येथे वास्तव्यास असत़े  सध्या पुण्यामध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने हा जिल्हा प्रशासनाकडून रेड झोन करण्यात आला आह़े आपल्या कुटुंबाच्या काळजीने ग्रासलेला हा अधिकारी काही दिवसांपूर्वी शासकीय गाडीने पुणे येथे गेला होत़ा रत्नागिरीमध्ये परत येताना या अधिकाऱयाने आपले संपूर्ण कुटुंब रत्नागिरीमध्ये आणत जिल्हाबंदीचा एक प्रकारे ‘विनोद’ केल़ा

रत्नागिरी येथे दाखल होताच हा अधिकारी राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांनी तत्काळ याला आक्षेप घेतल़ा तसेच कुटुंबाची वैद्यकीय तपासणी करून घेण्यास सांगितले होत़े मात्र या अधिकाऱयाने ‘आपले कोणी काही बिघडवू शकत नाही, तुम्हाला काय हवे ते करा’ असे उर्मटपणे बोलण्यास सुरूवात केल़ी  दरम्यान या इमारतीमधील रहिवाशांनी या बाबतची तक्रार जिल्हा प्रशासनाला केल़ी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याची दखल घेवून या अधिकाऱयाचे कुटुंब खासगी कंपनीच्या विश्रामगृहात क्वॉरंटाईन केले आह़े

जिह्यातील नागरिक गेला दिड महिना जिल्हाबंदी व लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहेत़ अशा परिस्थितीत जबाबदार पदावरील अधिकारीच जिल्हाबंदीचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत़ या अधिकाऱयाने कुटुंबासह जिह्यात प्रवेश करताना आपल्या पदाचा गैरवापर केल्याचे दिसून येत आह़े  मात्र त्याने शासकीय गाडी वापरली होती का, प्रशासन आता या अधिकाऱयावर कोणती कारवाई करणार, आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत़

,

Related Stories

सावंतवाडी शहरात उभारणार शिवरायांचा पुतळा

NIKHIL_N

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कामासाठी २१८ कोटी निधी मंजूर

Anuja Kudatarkar

रत्नागिरी जिल्ह्यातील समस्या जाणून घेत आखणार उपाययोजना : सीईओ जाखड

Archana Banage

कन्टेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची मदत

NIKHIL_N

रत्नागिरीत बनावट नोटा पसरवण्याचा बेत फसला

Patil_p

वेंगुर्ल्यात साकारतेय अद्ययावत कृषी तंत्रज्ञान, माहिती केंद्र

NIKHIL_N