Tarun Bharat

वरिष्ठ महिला हॉकीपटूंचे प्रशिक्षण शिबिर आजपासून

Advertisements

वृत्तसंस्था/ बेंगळूर

भारताच्या वरिष्ठ महिला हॉकी संघासाठी हॉकी इंडियातर्फे येथे सोमवारपासून राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिर आयोजित केले आहे. या सराव शिबिरासाठी 25 हॉकीपटूंची नावे घोषित करण्यात आली आहेत. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविणाऱया भारतीय महिला हॉकी संघातील 16 हॉकीपटूंचा या सराव शिबिरात समावेश राहणार आहे.

हॉकी इंडियातर्फे येथे सोमवारपासून सुरू होणाऱया वरिष्ठ महिला हॉकीपटूंसाठीच्या राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरामध्ये संभाव्य 25 हॉकीपटूंच्या यादीमध्ये गगनदीप कौर, मारियाना कुजूर, सुमनदेवी थोडम, महिमा चौधरी यांचा समावेश आहे. अनुभवी लिलिमा मिंझ, रस्मिता मिंझ, ज्योती, रजवींदर कौर आणि मनप्रित कौर त्याचप्रमाणे सलिमा टेटे, शर्मिला यांचाही या शिबिरात समावेश राहील. भारतीय क्रीडा प्राधिकरण मंडळाच्या (साई) केंद्रामध्ये हे शिबिर 20 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Related Stories

अँडी मरेचे विजयी पुनरागमन

Patil_p

‘सूर्य’ तळपला, मुंबई इंडियन्स जिंकली!

Omkar B

आयसीसीच्या स्पर्धा भरविण्यासाठी १७ देश उत्सुक

Patil_p

आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा लांबणीवर

Patil_p

कॅडेट वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रिया मलिकला सुवर्ण

Patil_p

प्रमोद भगत, सुकांत कदम उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!